दिल्ली/मुंबई/पुणे : दिवाळीत सर्वत्र फटक्यांचा धूमधडाका न्यायालयाने ठरवून दिलेल्या वेळे शिवाय फटाके फोडल्याबद्दल राज्यात ३१७ जणांवर गुन्हे दाखल झाले असून मुंबईत ८ जणांना अटक झाली आहे.
दिवाळीत रात्री आठ ते दहा या कालावधीतच फटाके फोडण्याचे बंधन न्यायालयाने घातले होते. मात्र या आदेशाचे देशातील अनेक भागांत सर्रास उल्लंघन झाले.
सोलापूर पोलीस आयुक्तांनी पहाटे आणि रात्री १० वाजेनंतर फटाके उडविणायांवर कारवाईचे निर्देश देताच ठाणेदारांनी १३६ जणांविरुद्ध भा.दं.वि. कलम १८८, १९० आणि १९१ नुसार गुन्हे दाखल केले. नागपुरात ६४ फटाकेबाजांविरुद्ध कारवाई करण्यात आली. तर मुंबई-ठाण्यात पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून शंभराहून अधिकव्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत. अनेकांकडून दंड वसूल करण्यात आला. तसेच बेकायदा फटाके विक्रेत्यांवरही गुन्हे दाखल झाले आहेत. पुणे कोल्हापुर व ईतर शहरात विनापरवाना फटाके विक्री केल्याबद्दल ३० विक्रेत्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
पुणे पोलिसांच्या नियत्रंण
कक्षाकडे व्हॉट्स अॅप क्रमांकावर ३५
तक्रारी आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेमुळे भविष्यात फटाक्यांच्या उत्पादनावरही मोठा परिणाम होणार आहे. पुढच्या वर्षी दिवाळीत फटाक्यांमुळे होणाया प्रदूषणात नक्कीच घट झालेली असेल, अशी आशाही काही नागरिक व्यक्त केली.जात आहे