पुणे दि,२६ :- पुणे शहरामध्ये वाढते प्रदुषण व वाढती वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी व्हि -ट्रो मोटर्स प्रा. लि.( V-tro motors Pvt ltd) या कंपनीच्या माध्यमातुन ग्रीन पुणेसाठी “इलेक्ट्रिक बाईक रेंटींग प्रोजेक्ट” हि संकल्पना पुणे शहरामध्ये राबविण्यात येणार असुन इलेक्ट्रिक बाईक रेंटींग प्रोजेक्ट” ला शहर सुधारणा समिती ने आज (शुक्रवारी) मान्यता दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पत्रकाद्वारे दिली.
या इलेक्ट्रिक बाईक ने प्रवास करण्यास केवळ कमीत कमी ९० पैसे प्रती कि.पासुन जास्तीत जास्त ४ रु प्रती किमी खर्च पुणेकरांना येणार आहे . प्रकल्प राबविण्यासाठी एका ठिकाणी १० बाईक चार्ज होतील असे मुख्य रस्त्यावर एक चार्जींग स्टेशन अशा प्रकारचे पुणे शहराच्या विविध भागामध्ये मुख्य रस्त्यांवर ५०० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यास मान्यता आज पुणे शहर सुधारणा समिती मध्ये देण्यात आली .
“या प्रकल्पामुळे भविष्यात पुणे मेट्रो ने प्रवास करणार्या नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असुन एकुणच शहरातील वाहतुक कोंडी, प्रदुषण कमी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पासाठी पुणे मनपा ला कोणतीही आर्थिक गुंतवणुक करायची नाही .प्रकल्प यशस्वी करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी व पुणे मेट्रो चे सुधा सहकार्य मिळणार आहे”, असे
अमोल बालवडकर (अध्यक्ष पुणे शहर सुधारणा समिती
नगरसेवक पुणे मनपा) यांनी आमच्या प्रतिनिधीस माहिती देताना सांगितले.