सातारा दि ०४ : – म्हसवड येथून अवैध वाळू वाहतुक करण्यास परवानगी देन्याकरीता मदत करण्यासाठी लाच स्विकारताना २ पत्रकारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (शुक्रवार) रात्री नऊ वाजण्याच्या सुमरास रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई म्हसवड येथे झाली आहे. या कारवाईमुळे संपुर्ण महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडाली असून अॅन्टी करप्शनने ताब्यात घेतलेल्यांमध्ये एका दैनिकाच्या पत्रकाराचा समावेश आहे.
१) मोल आदिनाथ खाडे , वय-३१, खाजगी इसम, रा. मु.पो पळशी ता. माण जि. सातारा
२) जयराम विठ्ठल शिंदे , वय-३२ वर्षे खाजगी ईसम, रा. मुपो पानवण , ता.माण जि. सातारा, अशी लाच घेताना ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. वाळु परवानगी देन्याकरीता मदत करण्यासाठी दोघांनी संबंधित तक्रारदाराकडे ५० हजाराच्या लाचेची मागणी केली होती. पहिला हप्ता म्हणून आज त्यांनी २५ हजार रूपये स्विकारले आहेत.
दरम्यान, अॅन्टी करप्शन पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, उप अधीक्षक सुषमा चव्हाण, पोलिस निरीक्षक
गुरुदत्त मोरे , पोलीस निरीक्षक , प्रशांत चौगुले पोलीस निरीक्षक, पोहवा संजय कलगुटगी,पोहवा संजय संकपाळ पोकॉ अविनाश सागर, पोना सलीम मकानदार, प्रितम चौगुले, चालक पोना बालासाहेब पवार यांच्या पथकाने सापळा रचुन त्यांना २५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. याबाबत अधिक माहिती देताना पोलिस अधिकार्यांनी सांगितले की दोघेही पत्रकार असून त्यामधील एक पुण्यातल दैनिकाचा पत्रकार आहे तर दुसरा पत्रकार हा सातार्यातील आहे. त्यांच्याकडे ओळखपत्र आढळले असल्याचे देखील पोलिस अधिकार्यांनी सांगितले आहे.