पुणे दि. 27- धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी धर्मादाय न्यासामार्फत गरीब, गरजू लोकांच्या मुला-मुलींचे मोफत सामुदायिक विवाह सोहळे करणे संदर्भात निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार पुणे शहरामध्ये १६ डिसेंबर २०१८ रोजी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या विवाह सोहळया मध्ये सहभागी होणाऱ्या वधू-वरांना पुणे जिल्हा मोफत सामुदायिक विवाह सोहळा समिती च्यावतीने संसारोपयोगी साहित्य, मनी मंगळसुत्र, कपडे इ. वस्तू देण्यात येणार आहेत. तसेच भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे.
वधूचे वय१८ वर्षापेक्षा कमी व वराचे वय २१ वर्षापेक्षा कमी असू नये. त्याबाबत वयाचा अधिकृत दाखला नोंदणी करताना करणे बंधनकारक असून वधू-वरांचे यापूर्वी लग्न झालेले नसलेबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक राहील.
ज्या इच्छूक वधूवरांना या सामुदायिक विवाह सोहळयामध्ये सहभागी होवून लग्न करावयाचे असेल त्यांनी, या धर्मादायसह आयुक्त या कार्यालयाकडे ५ डिसेंबर,२०१८ रोजी पूर्वी आपला लेखी अर्ज दाखल करावा. मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे धर्मादाय सह आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांनी कळविले आहे.