पुणे ,प्रतिनिधी : रिची बन्ना हे राजस्थानी संगीत उद्योगातील आजचे सर्वात प्रसिद्ध नाव आहे. राजस्थानी राजपुताना संगीतात वादळ निर्माण करणार्या हिट गाण्यांसाठी ओळखल्या जाणार्या
रिची बन्ना यांची जागतिक क्षत्रिय संघटनेने आपले ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून नुकतीच निवड केली आहे.
यावर्षी नोव्हेंबरमध्ये जगभरातील सर्व क्षत्रियांच्या संमेलनात त्यांना क्षत्रिय संघटनेचे ब्रँड एम्बेसेडर म्हणून निवडण्यावर शिक्कामोर्तब झाले. हे संमेलन कंबोडियामध्ये आयोजित करण्यात आले होते. तेथे जगाच्या काना-कोपर्यातून क्षत्रिय समाज आपल्या संस्कृतीची चर्चा करण्यासाठी आणि तिचा प्रसार करण्यासाठी एकत्र झाला होता. अंकोर वाटचे गव्हर्नर या कार्यक्रमाचे विशेष निमंत्रित होते आणि हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
आपल्या शेजारच्या लोणावळात जन्मलेल्या आणि वाढलेल्या रिचपाल सिंह राणावत यांची कथा संगीत आणि आपल्या राजपुतानाच्या वारसाबद्दल असलेल्या प्रेमाने सुरू झाली. राजपूतांचा वारसा आणि संगीतकाराचा आत्मा असलेल्या रिचपालने आपले पहिले गाणे 2014 मध्ये तयार केले. राजपुताना या शीर्षकाचे हे गाणे व्हायरल झाले आणि जवळजवळ प्रत्येक राजस्थानी त्या गाण्याच्या प्रेमात पडला. अन् त्यासोबतच रिची बन्नाचा प्रवास सुरू झाला.
आज रिची बन्नांच्या यूट्यूब चॅनेलचे 1 लाख सदस्य आहेत आणि त्यांची गाणी सरासरी 10 लाख वेळा पाहिली जातात. मी माझी गाणी स्वत: लिहितो आणि गेल्या 4 वर्षांत मी सुमारे 15 गाणी तयार केली आहेत. माझी बहुतांश गाणी राजस्थानी बोलीतील असली, तरी काही गाणी हिंदीतही आहेत, असे रिची यांनी सांगितले.
रिची यांनी या वर्गवारीत स्वत:चे एक स्थान निर्माण केले आहे. त्यांना मिळणारा प्रतिसाद एवढा जोरदार आहे, की राजपुतान्यातील जवळजवळ सर्व विवाहसोहळ्यात किंवा कार्यक्रमांत आपण गाणी ऐकत असाल तर ती गाणी रिची बन्ना यांचीच असण्याची सर्वाधिक शक्यता आहे.