कर्जत दि २४ :- २८ जानेवारी पासून २५ दिवसात वेगवेगळ्या गावच्या पोलीस पाटलांकडून प्राप्त झालेल्या एकूण 77 समन्स ची बजवणी झाली आहे व कर्जत पोलीस स्टेशन हद्दीतील समन्स बजावण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना प्रत्येक गावात जाऊन दैनंदिन कामकाज पाहून समन्स बजावण्यासाठी हद्द मोठी असल्याने अडचणी येत होत्या. नागरिकांना कोर्टात केस ची तारीख असून साक्ष आहे याबाबत माहिती मिळत नव्हती.
त्यावर उपाय म्हणून पोलीस पाटील यांच्या मदतीने जाऊन समन्स बजावू शकतो याबाबत पोलीस निरीक्षक यांनी विचार करून पोलीस पाटील यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचेशी पोलीस पाटील यांचे मदतीने समन्स बजावणी बाबत चर्चा केली. मा. न्यायालयाने सुद्धा व्हाट्सअप्प वर सुद्धा कायदेशीर रित्या समन्स बजावणी करू शकतो असे कळवून अनुमती दिली.
त्यानंतर हद्दीतील ४३ पोलीस पाटील यांच्याशी चर्चा करून व्हाट्सअप्प ग्रुप तयार करून गावातील समन्स बजावने बाबत सविस्तर माहिती दिली. बजावणी सुरू झाली असून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच सर्व समन्स आता वेळेवर बजावणी होत आहे. मागील 1 महिन्यात पोलीस पाटील यांनी समन्स बजावणी बाबत काम केले आहे.पोलीस पाटील – बजावलेले
समन्स.1) बाबासाहेब सूर्यवंशी, गुरवपिंपरि – 6,2)सुनील साळवे, रमजान चिंचोली -1,3) विजय कुमार अनारसे, आळसुंदे – 3, 4) ईश्वर जोगदंड, थेरगाव-1,5) अण्णा सांगळे, जलालपूर- 1,6) प्रशांत गवारे, कोकणगाव- 1,7) विनायक निंबाळकर, दिघी- 1,
8) दादासाहेब भोसले, बेडी- 4,9) प्रफुल्ल महामुनी- बाभूळगाव खालसा- 6,10)समीर पाटील कुळधरण -1,11) सुनील खेडकर, रवळगाव 1 ,12) दशरथ सायकर, अखोनी- 3,13) धनराज गिरी नागलवाडी -1,14) श्रीकांत फाळके कोरेगाव- 6 ,15) शुभाष गायकवाड बेनवडी-3,16) हनुमंत पंडित राक्षसवाडी बुद्रुक-1
17) सौ. संगीता भोसले दुधोडी -0118) सौ. हेमलता मिलिंद पंडित धलावडी – 0219) शिवाजी पाटील कुंभेफल – 07,
20) शिवाजी वायसे खांडवी – 01,21) अशोक गांगर्डे निमगाव गांगर्दा – 01,22) अप्पासाहेब घालमे शिंदा- 17,23) सौ. तिखे चांदे खुर्द – 02-24) विजय भिसे मलटण – 01-,25) लक्ष्मण कदम ताजु -0126) महेंद्र कर्पे वालवड -01-27) गोरख जमदाडे, कोळवाडी- 03,समन्स बाबत माहिती मिळालेले नागरिक हे कोर्टात सुद्धा हजर होत आहेत. ग्रुप वर त्याबाबत पोलीस निरीक्षक यादव, कोर्ट अंमलदार गणेश आघाव आणि संबंधित बिट अंमलदार यांच्या कडून पाठपुरावा केला जातो..
यामुळे पोलिसांवरील कामाचा ताण थोडयाफार प्रमाणात का होईना कमी होत आहे. साक्षीदार सुद्धा कोर्टात वेळेत हजर रहात आहेत. कोर्ट कामकाज सुरळीत चालनेस मदत होत आहे.. असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना चंद्रशेखर यादव,पोलीस निरीक्षक, कर्जत पोलीस स्टेशन. त्यांनी सांगितले आहे