पुणे :- पुण्यात तुन मुंबई – पुणे आणि मुंबई – नाशिक रोजचा प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पुण्यातून मुंबईसाठी सकाळी आठनंतर दुपारी साडेतीनपर्यंत एकही रेल्वे नाही.
मुंबई – पुणे आणि मुंबई – नाशिक या मार्गांवर रेल्वेची लोकल सेवा सुरु करण्याच्या दृष्टीने सध्या प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. मार्गातील घाटक्षेत्र लक्षात घेता त्यासाठी चेन्नई येथील कारखान्यात विशेष लोकलची निर्मिती करण्यात येत असून येत्या महिनाभरात प्रत्यक्ष मार्गावर गाडीची चाचणी घेतली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे मुंबईवरुन पुण्यात लोकल ट्रेनने जाण्याचे स्वप्न आगामी काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
पुण्यातून मुंबईसाठी सकाळी आठनंतर दुपारी साडेतीनपर्यंत एकही रेल्वे नाही. त्यामुळे या मार्गावर लोकल सेवा सुरु करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. तर मुंबई- नाशिक मार्गावरही लोकल सेवा सुरु करण्याची मागणी केली जात होती.