कर्जत,दि१७ :-तालुक्यातील राशीन येथील जगदंबा देवीची भव्य अशी पालखी मिरवणूक सोहळा चालू असताना दि.१६ ऑक्टोबर २१ रोजी १०:३० वाजेच्या सुमारास जगदंबा देवीच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी सतीश सहदेव भांडवलकर हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत घरासमोर दर्शन घेत असताना गर्दीचा फायदा घेत अनोळखी चोरट्याने सतीश भांडवलकर यांच्या आईचे गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र हिसकावून एम.एच ०३ बी.सी ०४७२ या क्रमांकाच्या स्विफ्ट कारमधून पोबारा केला.व बंदोबस्तासाठी असलेल्या अंमलदार यांनी त्याचा मोठ्या शिताफीने पाठलाग करून गाडी थांबवली असता गाडी चालक गाडी सोडून गर्दीचा फायदा घेऊन पळून गेला होता.त्यानंतर कर्जत पोलिस स्टेशनला सतीश भांडवलकर यांनी गाडी चालकाविरुद्ध मनी मंगळसूत्र चोरल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.कर्जत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सातपुते हे करत असताना गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हा बीड गांधीनगर येथील असल्याचे समजल्याने त्याचा शोध घेऊन ताब्यात घेतले असून बाळू इंद्रजीत बरसाले, २९ वर्षे, असे त्याचे नाव असून,रा. पांगरबावडी तेलगाव रोड बीड यास सदर गुन्ह्याचे तपासकामी अटक केली आहे. त्याची मा न्यायालयाने 8 दिवस पोलीस कस्टडी मंजूर केली असून त्याचे इतर दोन साथीदार अटक करणे आहे .सदर आरोपीकडून आणखी इतर गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार तुळशीदास सातपुते करत आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील , अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत भाग आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षीक सतीश गावित, सुरेश माने, पोलीस अंमलदार, तुळशीराम सातपुते, पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, गोवर्धन कदम, सुनिल खैरे, गणेश ठोंबरे, सागर म्हेत्रे, गणेश भागडे, भाऊ काळे, राणी व्यवहारे यांनी केली आहे
.श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे