पुणे, दि.०१ :- पुणे येथे सहा.पोलीस उपनिरीक्षक रेडीओ यांत्रीकी ( गट क ) या पदाचे भरती करीता खेळाची खोटे प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतुर्श्रुंगी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिनेश नवनाथ करांडे (बीड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी अपर पोलीस महासंचालक दळणवळण व परीवहन कार्यालयातील प्रमुख लिपिक किरण सोनार यांनी तक्रार दिली आहे.या प्रकरणी अधिक माहिती, दिनेश करांडे यांनी 2015 -16 मध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रेडीओ यांत्रिकी (गट क) या पदाच्या भरतीसाठी तीन प्रमाणपत्र सादर केली होती. महाराष्ट्र राज्य शूटिग बॉल अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्पर्धेतील औरंगाबाद जिल्हा कडून खेळलेले प्रथम क्रमांकाचे प्रमाणपत्र आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्पर्धेत बीड विभागाकडून खेळलेले तृतीय क्रमांकाचे प्रमाणपत्र सादर केले होते. हे तीनही प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यानंतर बनावट प्रमाणपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दिनेश करांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहा . पोलीस निरीक्षक,संदिप पवार करीत आहेत.