पुणे,दि.०३ :- निवृत्त पोलीस उप अधीक्षक दिलीप अर्जुनराव शिंदे यांचे अल्पशा अजाराने रविवारी (दि.3) निधन झाले. ते 69 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (दि.4) सकाळी 11.30 वा. वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
निवृत्त दिलीप शिंदे यांनी पुणे शहर , पुणे ग्रामीण, कोल्हापूर, राज्य वाहतूक शाखा अशा वेगवेगळ्या विभागात सुमारे 36 वर्षे नोकरी केली आहे. 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर दिलीप शिंदे 2011 मध्ये पोलीस उप अधीक्षक पदावरुन सेवानिवृत्त झाले.अत्यंत अभ्यासू व कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांचा पोलीस खात्यात लौकिक होता.
त्यांचे उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना राष्ट्रपतींचे पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले होते