“इंटरनॅशनल प्लास्टिक बॅग फ्री डे” निमित्त पुणे महानगरपालिके विविध कार्यक्रमांचे आयोजन व प्रभावी दंडात्मक कारवाई. » Telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, May 9, 2025
  • Login
  • Register
telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result
Home ठळक बातम्या

“इंटरनॅशनल प्लास्टिक बॅग फ्री डे” निमित्त पुणे महानगरपालिके विविध कार्यक्रमांचे आयोजन व प्रभावी दंडात्मक कारवाई.

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
03/07/2022
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
89
VIEWS

पुणे,दि.०३ :-केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व हवामानबदल मंत्रालयाने अधिसूचना क्र. जीएसआर – ३२० (इ) दिनांक १८.०३.२०१६ अन्यवे प्लॅस्टीक वेस्ट मॅनेजमेंट रुल्स – २०१६ लागू केलेले होता.तसेच महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने अधिसूचना क्रमांक प्लॅस्टीक – २०१८ / प्र.क्र. २४/तां.क्र.४ ११२०१७ दिनांक एप्रिल २३, मार्च २०१८ नुसार अविघटनशील कचऱ्यामुळे एकूणच नागरिकांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत असल्याने “महाराष्ट्र प्लॅस्टीक व थर्मोकॉल अविघटनशील वस्तूंचे (उत्पादन, वापर विक्री, वाहतुक, हाताळणी, साठवणूक व तद्नंतर वेळोवेळी केलेल्या सुधारणा) अधिसूचना, २०१८ संपूर्ण राज्यासाठी लागू करण्यात आली आहे.” तसेच दिनांक ११ एप्रिल २०१८, दिनांक ३० जून २०१८, दिनांक १४ जून २०१९, दिनांक १२ ऑगस्ट २०२१, दिनांक १६ फेब्रुवारी २०२२ व दिनांक २८ मार्च २०२२ अन्वये वेळोवेळी सुधारीत अधिसूचना पारीत करण्यात आलेल्या आहेत.
भारत राजपत्र सं ४५९, दिनांक १२/०८/२०२१ रोजीच्या अधिसूचनेनुसार प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमावली २०१६ मधील तरतुदींचे उल्लंघन होईल अशा प्रकारची प्लास्टिक ने-आन, प्लास्टिक कॅरी बॅग्ज (७५ मायक्रोनपेक्षा कमी), विघटनशील नसलेले प्लास्टिक (प्लास्टिकचे झेंडे, प्लास्टिक प्लेट्स, प्लास्टिकचे चहा कप, पाण्याचे पाऊच, प्लास्टिक स्ट्रॉ इ.) नॉन वॉवन बॅग्ज, स्टायरोफोम, थर्माकोल, प्लास्टिक पत्रके, प्लास्टिक पत्रकांची आवरणे किंवा प्लास्टिक सहित बहुस्तरीय आवरण, वेष्टने असलेल्या वस्तू व सिंगल युज प्लास्टिक कोणतीही व्यक्ती निर्माण करणार नाही, साठवणार नाही, वितरीत/विक्री करणार नाही किंवा वापरणार नाही.
प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २१६ च्या नियम ४(२) नुसार (सुधारित केल्यानुसार), “पॉलीस्टीरिन आणि विस्तारित पॉलिस्टीरिनसह खालील एकल वापराच्या प्लास्टिक (SUP) चे उत्पादन, आयात, साठा, वितरण, विक्री आणि वापर दिनांक १ जुलै २०२२ पासून प्रभावीपणे प्रतिबंधित असतील.
1. प्लास्टिकच्या काड्या असलेले इअरबड्स, फुग्यासाठी वापण्यात येणा-या प्लास्टिकच्या काड्या, प्लास्टिकचे ध्वज, कँडी स्टिक्स, आइस्क्रीम स्टिक्स, सजावटीसाठीचे पॉलिस्टीरिन;
2. प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी जसे की काटे, चमचे, चाकू, पेंढा, ट्रे, मिठाईचे बॉक्सेस, निमंत्रण पत्रिका आणि सिगारेटची पाकिटे गुंडाळण्यासाठी वापरलेल्या पॅकिंग फिल्म्स, 100 मायक्रॉनपेक्षा कमी आकाराचे प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर, स्टिरर इ.
प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2016 च्या नियम ४(१)(क) नुसार (सुधारणा केल्यानुसार) “व्हर्जिन किंवा पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकची कॅरी बॅग दिनांक ३० सप्टेंबर २०२१ पासून पंचाहत्तर (७५) मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची नसावी आणि दिनांक ३१ डिसेंबर २०२२ पासून एकशे वीस (१२०) मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची नसावी.
महाराष्ट्र शासनाच्या २३ मार्च २०१८ च्या अधिसूचनेनुसार, संपूर्ण राज्यात हँडलसह आणि हँडलशिवाय असणा-या प्लास्टिक पिशव्यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून या सर्व नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्ती/संस्था/कंपन्यांवर पुणे महानगरपालिकेमार्फत प्रभावी दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
तसेच दिनांक ०३/०७/२०२२ रोजी “इंटरनॅशनल प्लास्टिक बॅग फ्री डे”उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त पुणे महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत विविध स्थानिक नागरिक गट, मोहल्ला कमिटी सदस्य, विविध स्वयं सेवी संस्था यांच्या सहभागातून भाजी मंडई, मुख्य रस्ते सार्वजनिक ठिकाणी, रहिवासी आस्थापनांमध्ये व शाळा/महाविद्यालयांमध्ये प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती करून प्लास्टिकला पर्याय असणा-या वस्तुंचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे जनजागृतीपर रॅली चे आयोजन करण्यात आले..
या “इंटरनॅशनल प्लास्टिक बॅग फ्री डे” निमित्त पुणे महानगरपालिकेमार्फत बंदी असलेले प्लास्टिक न वापरणेचे आणि प्लास्टिकला पर्यायी वस्तुंचा वापर करण्याचे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात आले.

Previous Post

विधानसभेच्या अध्यक्षपदी ॲड. राहुल नार्वेकर यांची निवड

Next Post

श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड संस्थेच्या कार्यकारणीवर दिलीप शिंदे यांची कार्याध्यक्षपदी,तर उपाध्यक्षपदी राजेंद्र किरवे यांची निवड .

Next Post

श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड संस्थेच्या कार्यकारणीवर दिलीप शिंदे यांची कार्याध्यक्षपदी,तर उपाध्यक्षपदी राजेंद्र किरवे यांची निवड .

  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us