पुणे,दि.२१ :- पुण्यातील बंडगार्डन परिसरात रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात डिजे सिस्टिम लावून संगीत वाजवणाऱ्या ‘One8 कम्यून बार’ (One8 व ‘मिलर्स लक्झरी क्लब’वर पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली आहे. पोलिसांनी हॉटेलमधून साऊंड सिस्टीम, डिजे मिक्सर जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.19) केली.सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक बंडगार्डन परिसरातील राजा बहादुर मिल येथील ‘One8 कम्यून बार’ व ‘मिलर्स लक्झरी क्लब’ येथे मोठ्या आवाजात सांउड सिस्टिमवर संगीत वाजवले जात असल्याची गोपनीय माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकाला मिळाली. व त्याठिकाणी छापा टाकला असता मोठ्या आवाजात संगीत सुरु असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोन्ही हॉटेलमधील एक लाख 70 हजार रुपये किमतीचे सांउड सिस्टिम जप्त केले आहे. पोलिसांनी हॉटेलवर पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत ध्वनी प्रदुषण अधिनियमानुसार कारवाई केली. जप्त केलेला मुद्देमाल बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाब कर्पे, मनिषा पुकाळे, इरफान पठाण, संदीप कोळगे यांच्या पथकाने केली.