पुणे,दि२८- पुण्यातील बाईक टॅक्सीविरोधात रिक्षा संघटनांनी आंदोलन आज पासून आरटीओ कार्यालयासमोर रिक्षाचालक उपोषण करणार आहेत. तसेच रिक्षा बंदमध्ये देखील मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक सहभागी होणार आहेत. रिक्षा चालक संपाच्या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून जास्तीच्या बस रस्त्यावर उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे १७०० बस प्रवाशांच्या सेवेत धावतील. नेहमीच्या तुलनेत सुमारे १०० बस जास्तीच्या सोडल्या जाणार आहे.
आरटीओ प्रशासन व वाहतूक पोलिस बाईक टॅक्सीविरोधात जुजबी कारवाई करीत आहे. प्रवासी सेवा देणाऱ्या कंपनीच्या ॲपमधून बाईक टॅक्सीचा पर्याय काढून टाकण्यात यावा या मागणीसाठी रिक्षा संघटना उपोषण करणार आहेत.प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पीएमपी प्रशासन पूर्ण क्षमतेने बस रस्त्यावर आणणार आहे. ग्रामीण भागातील फेऱ्याची संख्या कमी करून त्या बस शहरात विविध मार्गावर सोडणार आहेत. रिक्षा बंदच्या पार्श्वभूमीवर जास्तीच्या बस सोडण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील फेऱ्या कमी करून त्या शहरात सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
– दत्तात्रेय झेंडे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल, पुणे