पुणे, दि.७: पुण्यात होणाऱ्या ‘जी-२०’ परिषदेबाबत नागरिकांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने पुणे महापालिका सायकल क्लबतर्फे सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, डॉ. कुणाल खेमनार आणि विकास ढाकणे यांनी झेंडा दाखवून या फेरीचा शुभारंभ केला.
सायकल फेरीच्या माध्यमातून ‘जी-२०’ बाबत तसेच पर्यावरण विषयक जनजागृती करण्यात आली. महापालिका मुख्य भवनापासून सुरू झालेली सायकल फेरी जंगली महाराज रस्ता, लोकमान्य टिळक रस्ता, थोरले बाजीराव रस्ता, शनिवार वाडा आणि पुन्हा महानगरपालिका इमारत अशा मार्गाने पूर्ण करण्यात आली.
सुमारे पंधराशे सायकलप्रेमी नागरिक या सायकल फेरीत सहभागी झाले. पुणे महापालिकेचे सर्व विभाग प्रमुखदेखील या सायकल फेरीत सहभागी झाले होते.
या सायकल फेरीचे नियोजन पुणे महानगरपालिका सायकल क्लबचे मुख्य समन्वयक व महापालिकेचे उपायुक्त (क्रीडा) यांनी केले. व
तीनही अतिरिक्त महापालिका आयुक्त यांनी व इतर महानगर पालिकेतील अधिकारी यांनी रॅली पूर्ण केली. यानंतर सर्वांना मेडल देण्यात आले. या रॅलीचे संपूर्ण आयोजन अल्प कालावधीत सुरेश परदेशी, मुख्य समन्वयक पुणे महानगरपालिका सायकल क्लब यांनी केले. यासाठी त्यांना प्रशांत गवळी, महेश कारंडे, विशाल भोसले, विशाल पाटील, विजय इंगळे, पुनम दर्डिगे आणि एस आर नेहा भावसार यांनी आयोजनात महत्वाची कामगिरी बजावली. तसेच संपूर्ण नियोजन संतोष वारुळे उपायुक्त क्रीडा यांनी केले.