पुणे,दि.०७:- शिवाजी नगर परिसरातील जंगली महाराज येथिल खाऊगल्ली येथे दि ५ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास खाद्य पदार्थ विक्री करणार्या एका महिलेवर कोयता उगारून त्यांना जीवे मारण्याची धमकी देवून परिसरात दहशत निर्माण करणार्या टोळीतील चौघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.
रणजित रघुनाथ रामगुडे (20), रोहन गोरख सरक (19, दोघे रा. विठ्ठल मंदिराशेजारी, सुतार चाळ, सुतारवाडी, पाषाण), विशाल शंकर सिंह (18, रा. ओमकार गणेश मंदिराजवळ, संगमवाडी) आणि आदित्य राजेश वडसकर (19, रा. शिवाजीनगर गावठाण, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, अटक आरोपी आणि त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांनी दि. 5 जानेवारी रोजी शिवाजी नगर परिसरातील जंगली महाराज येथिल खाऊगल्लीमध्ये एका खाद्य पदार्थ विक्री करणार्या महिलेवर कोयता उगारून जीवे मारण्याची धमकी दिली होती. परिसरात दहशत निर्माण केली होता. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने ,
पोलिस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड, सहाय्यक निरीक्षक भोलेनाथ अहिवळे
आणि तपास पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यानंतर आरोपींची ओळख पटविण्यात आली.
आरोपींचा शोध घेवुन
विधीसंघर्षितीत बालके यांना शिताफिने वेगवेगळ्या ठिकाणाहून पकडण्यात आले. त्यांना विश्वासात घेवुन त्यांचेकडे अधिक चौकशी करता त्यांनी दाखल गुन्हा केलेचे कबुल केले आहे.व त्यांना अटक करण्यात आले. आरोपींकडून गुन्हयात वापरलेले चार लोखंडी कोयते आणि 4 दुचाकी गाडया असा एकुण 1 लाख 25 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल, सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनखाली
पोलिस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड, सहाय्यक निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, पोलिस अंमलदार अविनाश भिवरे,
गणपत वाळकोळी, बशीर सय्यद, रणजित फडतरे, आदेश चलवादी आणि दिलीप नांगरे यांच्या पथकाने
आरोपींना अटक केली आहे.