पिंपरी चिंचवड,दि.०५:-पिंपरी चिंचवड शहरातील आयुक्त विनयकुमार चोबे यांनी ऑपरेशन ऑल आऊट राबवलं आहे.शेकडो शस्त्रे त्याचबरोबर शंभरहून अधिक गुन्हेगारांना जेरबंद पोलिसांनी केलं आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनची ही मोठी कारवाई केली आहे पोलीस कारवाईत 48 बंदुका, 89 जिवंत काडतुसे, 205 कोयते जप्त करण्यात आले आहेत.हा शस्त्रसाठा केवळ पंधरा दिवसात हस्तगत केला आहे. गुन्हेगारांना हद्दपार करण्यासाठी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मिशन ऑल आउट राबवले आहे. दरम्यान यातून सुमारे 211 गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले
आहेत.पिंपरी चिंचवड पोलीस दलातील गुंडाविरोधी पथकाने ही कामगारी करत हा शस्त्रसाठा जप्त केला आहे. पिंपरी चिंचवडची पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेलं या ऑपरेशनमध्ये पिंपरी शहरातील गुंडांच्या सात कुख्यात टोळ्या विरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करत सुमारे 110 गुन्हेगारांच्या मुसक्याही आवळल्या गेल्या आहेत.अनिल तुकाराम मोहिते टोळी आणि त्यातील, 10 सदस्य, हिरा बहादुर हमाल टोळी व 07 सदस्य, शुभम सुरेश म्हस्के व इतर 17, दत्ता बाबु सुर्यवंशी व इतर 3, आकाश राजू काळे व इतर 06, विशाल विष्णू लष्करे व इतर 30, कुणाल धिरज ठाकुर व इतर 29, अक्षय मुकुंद गायकवाड एमपीडीए अंतर्गत स्थानबध्द करण्यात आले आहे.पिंपरी चिंचवड पोलीस दलाच्या या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारांची धाबे दणाणले आहे.
सदर कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त, मनोज लोहिया, अपर पोलीस आयुक्त, संजय शिंदे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, स्वप्ना गोरे पोलीस उपआयुक्त, परिमंडळ- १ विवेक पाटील, व पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – २ काकासाहेब डोळे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १९ जानेवारी ते ०३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीमध्ये विशेष मोहिम राबविण्यात येवून आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा युनिट यांना कारवाई करण्यातआले होते.या मोहिमेमध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेकडील प्रथम क्रमांक दरोडा विरोधी पथक, द्वितीय क्रमांक गुंडा विरोधी पथक व तृतीय क्रमांक युनिट -४ यांनी मिळवला आहे. त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन स्तरावर महाळुंगे, शिरगांव, पिंपरी या पोलीस स्टेशन कडून उत्कृष्ट कामगिरी करण्यात आली आहे.उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या घटक प्रमुखांना व अंमलदारांना मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांचेकडून प्रशस्तीपत्र देण्यात येवून गौरविण्यात आले आहे. तसेच यापुढील काळातही हत्यार वापरून गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाईची मोहिम चालूच राहणार आहे.