पुणे दि.22:-आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी सुरु झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज पुणे शहरातील २१५ कसबा विधानसभा मतदारसंघातील श्रीमती सावित्रीबाई फुले इंग्रजी माध्यम शाळा, रफीक अहमद किडवाई ऊर्दू माध्यमिक विद्यालय या मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील प्राथमिक सुविधांची पाहणी केली. मतदान केंद्र, दिव्यागांसाठी सोयी आदींचा आढावा घेतला.
यावेळी पोलीस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम, उप विभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, झोनल अधिकारी अविनाश घोडके, मंडल अधिकारी प्रमोद साळी, तलाठी एस.एन.नांगरे, अजिंक्य वनशिव, सौरभ शिरसाठ, बाळासाहेब आखाडे, सतीश देशमुख आदि उपस्थित होते