पुणे दि,२२:- बंगालमधील मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांना मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाकडून लॉजवर छापा टाकण्यात आला. त्यावेळी २ बांग्लादेशी व ३ पश्चिमबंगाल मुलींची तेथून सुटका करण्यात आली.आहे व गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने फुरसुंगी येथील त्रिशूल लॉजमध्ये छापा टाकून सेक्स रॅकेचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी येथून २ बांग्लादेशी आणि ३ पश्चिमबंगाल येथील तरुणींची सुटका केली आहे. तर लॉजचालक व एजंटाला अटक केली आहे.
टोरीकुल सिराजून ढाली (३२, वाशी, नवी मुंबई, मुळ प, बंगाल) व लॉजचालक मोहन शेखर शेट्टी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात इटपा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी येथील त्रिशूल लॉजमध्ये मोहन शेट्टी हा परदेशातील व प. बंगालमधील मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांना मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाकडून लॉजवर छापा टाकण्यात आला. त्यावेळी एक बांग्लादेशी व २ प. बंगालच्या व ३ पश्चिमबंगालमुलींची तेथून सुटका करण्यात आली. त्याचवेळी एक दलाल बांग्लादेशी व प. बंगालच्या तरुणींना घेऊन मुंबईहून येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथेच दबा धरून सापळा रचला. दलाल तेथे दोन मुली घेऊन आला. त्यावेळी त्याला पकडण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने वेश्या व्यवसायाकरताच मुली आणल्या असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर टोरीकू ढाली व लॉजचालक शेट्री या दोघांना ताब्यात घेण्यात आले. व २ बांग्लादेशी आणि ३ पश्चिमबंगालच्या मुलींची सुटका करून त्यांची रवानगी महंमदवाडी येथील रेस्क्यू होममध्ये करण्यात आली.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे, सहायक पोलीस निरीक्षक अनिता खेडकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक शेलार, राजाराम घोगरे,ज्ञानेश्वर देवकर, नरेश बलसाने, राजेंद्र कचरे, राजेंद्र ननावरे, सचिन कदम, प्रदिप शेलार, तुषार आल्हाट, किरण अब्दागिरे, निलेश पालवे, रेवनसिद्ध नरोटे, महिला कर्मचारी ढेबे, काळे तसेच हडपसर पोलीस ठाण्याचे पथक यांनी केली