तुळजापुर,दि.२२:- साडे तीन शुभ मुहूर्त पैकी आजचा एक मुहूर्त असल्याने व मराठी नवीन वर्षाचा दिवस असल्याने तुळजाभवानी देवीला छत्रपती शिवाजी महाराज यांनी अर्पण केलेले शिवकालीन अलंकार घालण्यात आले. यात जय भवानी , राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरण्यात आलेली सोन्याची माळ,मोती माणिक व रत्नजडीत जरी टोप त्यावर महादेवाची पिंड,मंगळसूत्र असे हे अलंकार घालण्यात आले त्यानंतर पाडवा वाचन करण्यात आले.
देवीची पहाटे आरती करुन तुळजाभवानी मातेच्या मंदिरावर गुलाबी रंगाच्या साडीची गुढी उभारून भगवा ध्वज लावण्यात आला. तुळजाभवानी मातेचे मुख्य पुजारी यासह पुजारी भक्तांच्या उपस्थितीत गुढी उभारून देवीला साखरेचा हार अर्पण करण्यात आला आहे.