पिंपरी चिंचवड,दि.२६:- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त हद्दीतील तळेगाव दाभाडे परिसरात अवैध रित्या गुटखा तस्करी करत असलेल्या आरोपीचा डाव पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाच्या पोलीसांनी उधळून लावला आहे. गुटख्यासह सुमारे साडे सात लाख रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी सापळा रचून जप्त केला आहे.
या कारवाईत तळेगाव दाभा डे परिसरात अवैध गुटखा विक्रीचा डाव गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाच्या पोलीसांनी उधळून लावला आहे. २ लाख ९५ हजार रूपयांच्या किंमतीच्या गुटख्यासह सुमारे साडे सात लाख रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी सापळा रचून जप्त केला आहे.
या कारवाईत पोलीसांनी २ आरोपींना अटक देखील केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या अधिपत्याखाली सहायक पोलीस निरीक्षक उध्दव खाडे हे स्टाफसह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहीती काढण्याकरीता, तळेगाव दाभाडे भागात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी त्यांना खबर मिळाली की, राखाडी रंगाची मारुती कंपनीची इको गाडी कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे येणार असुन, त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा सदृश्य पदार्थाचा साठा तस्करी करीत आहे
गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरिक्षक उध्दव खाडे यांनी सोबत असलेल्या स्टाफ कडोलकर कॉलनी येथील लायन्स क्लब जवळ सापळा लावला. दिनांक २५/०३/२०२३ रोजी रात्री दिडच्या सुमारास इको कार मधुन निहार गोपाल विश्वास (वय ५१ वर्षे रा. तळेगाव दाभाडे ता. मावळ जि. पुणे) असे सांगून त्याच्या सोबत असलेला इसम हा त्याचा कामगार असुन त्याचे नाव अविजीत रणजीत बाच्छार (वय २६ वर्षे) यांना शिताफिने ताब्यात घेतले.पोलीसांनी इको कारची पाहणी केली असता, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, पान मसाला, तंबाखुजन्य पदार्थ या असुरक्षित आरोग्यास घातक, अपायकारक असा गुटखा मिळुन आला. व ७ लाख ५४ हजार ५५४ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरूध्द तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.असा २,९४,५५४/- रुपये किंमतीचा गुटखा मिळुन आल्याने, इको कार, ०२ मोबाईल व २,९४,५५४/- रुचा गुटखा, पान मसाला, तंबाखुजन्य पदार्थ असा एकुण ७,५४,५५४/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन, त्यांचेविरुध्द तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन गुरनं. १३६ / २०२३ भा.दं.वि. कलम ३२८, २७२, २७३, १८८, ३४ सह अन्न व सुरक्षा मानके कायदा कलम ३० (२)(ए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मनोज लोहीया, सह पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, डॉ. प्रशांत अमृतकर, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहा.पो.उप निरी. अशोक दुधवणे, पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, सुधीर डोळस यांचे पथकाने केली आहे.