पुणे दि.28- ई पॉस मशीनव्दारे धान्यवितरण करताना त्याव्दारे निधणारी पावती घेण्याची सवय शीधापत्रिकाधारकांना लागावी व ग्राहकांमध्ये जागृती व्हावी याकरीता अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन, संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट यांच्या संकल्पनेतुन व अन्न धान्यवितरण अधीकारी पुणे यांच्या मार्फत पुणे शहर अन्नधान्य वितरण क्षेत्रामध्ये प्रोत्साहनपर भाग्यशाली सोडत योजनेचे माहे फेब्रुवारी 2019 मध्ये आयोजन करण्यात आले आहे.
विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे नवीन इमारतीमधील सभागृह येथेदिनांक 1 मार्च 2019 रोजी सकाळी 11 वाजता भाग्यशाली सोडत योजनेतील विजेत्यांची लॉटरीव्दारे नावे निश्चीत करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेचविभागीय आयुक्त कार्यालय, पुणे हेरीटेज बिल्डींग (जुनी बिल्डींग) तळमजला येथे दिनांक 3 मार्च 2019 रोजी सकाळी 11 वाजता अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्नव औषध प्रशासन, संसदीय कार्य मंत्री तथा पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते बक्षीसवितरणाचे आयोजन करण्यात आले आहे, असे अन्नधान्य वितरण अधीकारी अस्मीता मोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळवीले आहे.