बारामती दि. २३ : – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर 35- बारामती लोकसभा मतदारसंघातील क्षेत्रिय अधिकारी आणि मतदान प्रक्रीयेशी संबंधित सर्वच कर्मचा-यांकरीता प्रथम प्रशिक्षणाचे आयोजन आज माळेगाव इंजिनिअरींग कॉलेज येथील शरद सभागृहामध्ये पार पडले.एकूण 2 सत्रामध्ये या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाकरीता निवडूकीशी संबंधित सर्वच विषयांकरीता नियुक्ती करण्यात आलेले अधिकारी व कर्मचा-यांची उपस्थिती होती. या प्रशिक्षणावेळी नव्याने वापरण्यात येणा-या व्हीव्हीपॅट मशीनचे प्रशिक्षण प्रत्यक्ष हाताळणीद्वारे उपस्थितांना देण्यात आले. तसेच प्रांताधिकारी हेमंत निकम व तहसिलदार विजय पाटील यांनी वेगवेगळया विषयांवर मार्गदर्शन केले.