पुणे दि,२४ : – पुणे वडाची वाडी येथील २ वर्षाचा मुलगा घरापाशी खेळत असताना त्याच अपहरण करुन १० लाखांची खंडणी मागणाऱ्या चोरट्यांच्या ताब्यातून मुलाला पुणे पोलिसांनी ११ तासाच्या प्रयत्नानंतर सुखरुप सुटका करण्यात यश मिळविले़ आहे
पुष्कराज सोमनाथ धनवडे असे या मुलाचे नाव आहे. गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच कोंढवा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रात्रभर राबविलेल्या शोध मोहिमेमुळे पुष्कराजचा शोध लागू शकला.
सोमनाथ धनवडे हे व्यावसायिक असून त्यांचा पुणे वडाची वाडी येथे राहत आहे. शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता पुष्कराज हा घराच्या आवारात खेळत होता. तेव्हा त्याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर काही वेळाने सोमनाथ धनवडे यांना फोन करुन अपहरण कर्त्यांनी मुलाला सोडायचे असेल तर १० लाख रुपयांची खंडणी मागितली.होती धनवडे यांनी ही माहिती तातडीने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला तपास दरम्यान पोलिसांना उंड्री परिसर पिंजून काढला व एका ठिकाणी बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी पुष्कराज आढळून आला