पुणे दि,०६ : –पुण्यातील माजी आमदार बापूसाहेब पठारे, मुलगा रविंद्र पठारे यांच्यासह कुटुंबातील एकूण ७ जणांवर सासरच्यांकडून केल्या जाणाऱ्या अत्याचारासंदर्भात सुनेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर माजी आमदार बापूसाहेब पठारे, मुलगा रविंद्र पठारे यांच्यासह कुटुंबातील एकूण ७ जणांवर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती रविंद्र बापूसाहेब पठारे, सासरे बापूसाहेब तुकाराम पठारे, सासू संजिला बापूसाहेब पठारे, दिर सुरेंद्र बापूसाहेब पठारे, तिचे आई आणि वडील अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बापूसाहेब पठारे यांच्या सुनेने याप्रकरणी राज्य महिला आयोगाकडे केली होती. त्याची दखल महिला आय़ोगाने घेत त्यांना आयोगासमोर कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश दिला होता.
वडगाव शेरीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या सुनेचा पती, दीर यांनी छळ केला. दोघांनी तिचा लैंगिक छळ केला असून त्यानंतर तिने राज्य महिला आयोगाकडे यासंदर्भात इमेल करून तक्रार केली होती. त्यानंतर महिला आयोगाने याची दखल घेत पठारे यांच्या कुटुंबियांना चौकशीसाठी २६ फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचा आदेश दिला होता. तिला संबंधितांनी जीवे मारण्य़ाचा प्रयत्न केला असल्याने तिने आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. त्यामुळे तिला पोलीस संरक्षणही देण्यात आले होते. त्यानंतर चंदननगर पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास चंदननगर पोलीस करत