पुणे दि,१० : –पुणे ग्रामीण पोलिस दलातील रांजणगांव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी यांनी न्यायालयातुन जामिन मिळवुन देण्यास मदत करण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक कारवाई दरम्यान मदत करण्यासाठी 5 हजार रूपयाची लाच घेणारा पुणे ग्रामीण पोलिस दलातील पोलिस कर्मचारी अॅन्टी करप्शनच्या जाळयात 5 हजार रूपयाची लाच घेताना पुणे ग्रामीण पोलिस दलातील पोलिस कर्मचारी यांना अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
पोलिस नाईक विनायक नानासाहेब मोहिते (बक्कल नं. ५३४, वय ४५) असे लाच घेणार्याचे नाव आहे. तक्रारदार यांच्या भावा विरूध्द गुन्हा दाखल आहे. त्या गुन्हयात जामिन होण्यासाठी तसेच प्रतिबंधात्मक कारवाई दरम्यान मदत करण्यासाठी पोलिस कर्मचारी मोहिते यांनी ६ हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने लाचलचुपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली.
अॅन्टी करप्शनच्या पथकाने आज (गुरूवार) शिरूर येथील नवीन प्रशासकीय इमारतीजवळ ५ हजार रूपयाची लाच स्विकारताना पोलिस नाईक मोहिते यांना सरकारी पंचासमक्ष रंगेहाथ पकडले. पोलिस नाईक मोहिते यांच्याविरूध्द शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक संदीप दिवाण, पोलिस उपाधिक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.