पुणे :- फिनोलेक्स पाईप्स कंपनीचे सीएसआर भागीदार मुकुल माधव फॉऊंडेशन व फीक्की फ्लो पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच साई मित्र परिवार पुणे पर्याय सामाजिक संस्था कळंब आणि कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर उस्मानाबाद यांच्या सौजन्याने एकल महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी मोफत सोयाबीन आणि तूर बीज वितरण कार्यक्रमाचे आयोजन दुपारी २:३० वाजता रायगड मंगल कार्यालय ढोकी रोड कळंब येथे करण्यात आले होते. त्यावेळी राज्याचे कृषीमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुजितसिंह ठाकूर, प्रसंगी मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया, फिनोलेक्स पाईप्सचे उपाध्यक्ष बी. आर. मेहता, फिक्की फ्लो पुणे चॅप्टरच्या सदस्या अनिता सणस, रेखा मगर, अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण, पर्याय संस्थेचे विश्वनाथ तोडकर, मुकुल माधव फाउंडेशनचे बबलू मोकळे, सचिन कुलकर्णी, मंगेश तळेकर, अमोल ठाकरे आदी उपस्थित होते
त्यावेळी प्रातिनीधीक स्वरूपात अनिता कानडे हसेगांव,विद्या मोरे सारोळा, आशा बोराडे डिकसळ, ईदूबाई अडसुळ भोमजळ, उषा देवे लाखनगाव या पाच महिलांना तुर बियांणाचे वाटप केले नंतर एकूण ४१२ महिलांना तूर, सोयाबीन या बियाणाचे वाटप करण्यात आले केले
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, मीदेखील अडीच एकर जमीन असलेल्या शेतकऱयाचा मुलगा आहे. शिवसेना-भाजप पक्षात साधे लोकही वरच्या पदाला पोहोचतात. आपण ग्रामीण भागातील लोक स्वाभिमानी असतो. आपल्याला देणगी, अनुदान चालत नाही. पण नैसर्गिक आपत्तीमुळे ही परिस्थिती आली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि शेतकऱयांना स्वतःच्या पायावर लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली आणली जात आहे. जलसंधारण काम सुरु असून पडलेल्या पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्याचा मानस आहे. शेततळी उभारली जात आहेत. त्यामुळे यंदा पीक चांगले येईल. त्याला चांगला भाव देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शेतकऱयांनी शेतीला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्याने वेगळे प्रयोग करावेत.”
कृषी सहाय्यक हा राज्य शासन आणि शेतकऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा आहे. त्यांनी शासनाच्या योजना, कृषिविषयक सल्ला आणि मार्गदर्शन आदी बाबी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात त्याचा ग्रामस्थ, शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल. कृषी सहाय्यकांनी मिशन म्हणून काम केले पाहिजे. तसेच जलयुक्त शिवार योजनेतून राज्यातील २२ हजार गावात जलसंधारणाची मोठी कामे झाल्यामुळे यंदाच्या दुष्काळाची तीव्रता कमी झाली, असे कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
महिलांना शिक्षण आणि रोजगार देणे गरजेचे आहे. महिला पैसे कमवायला लागतील, तेव्हाच त्यांची किंमत वाढेल. महिलांनी शक्तीचा आणि बुद्धीचा वापर करून अर्थार्जन करावे. मुलींचे शिक्षण बंद होणार नाही, याची काळजी आपण सर्वांनी मिळून घेतली पाहिजे. सुरक्षित आयुष्य जगण्यासाठी विमा उतरवला पाहिजे
बाळू राऊत मुंबई प्रतिनिधी