मुंबई दि,१७ :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं मुंबईची जबाबदारी मंगल प्रभात लोढांवर सोपवली आहे. आशिष शेलार यांच्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदासाठी अनेक नावं चर्चेत होती. मात्र अखेर लोढांकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. काही दिवसांपूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यात आशिष शेलार यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर आता त्यांच्या जागी मंगल प्रताप लोढा यांची निवड करण्यात आली. बांधकाम क्षेत्रातील मोठं नाव असलेल्या लोढा यांची अनेकदा मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान चर्चेत होतं. मात्र आता त्यांच्याकडे मुंबई भाजपाची जबाबदारी देण्यात आली आहे. या पदासाठी खासदार मनोज कोटक आणि आमदार योगेश सागर यांची नावं चर्चेत आहे.मुंबईतील गोरेगावमधील नेस्कोमध्ये 21 जुलै रोजी भाजप कार्यकारिणीची बैठक आहे. या बैठकीत सर्व केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार, पक्षाचे पदाधिकारी सामील होणार आहेत. बैठकीला भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डाही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अवघ्या तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची समजली जात आहे. मुंबई अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बाळु राऊत मुंबई प्रतिनिधी