पुणे, दि.13 : भारत देश हा विविध सण आणि संस्कृतीने नटलेला असून भारतीय म्हणून या विविधतेही एकतेची भावना देशातील नागरिक व विदर्थ्यांमध्ये आहे. ही एकतेची भावना रुजविण्यामध्ये सण आणि संस्कृती यांचा वाटा मोलाचा आहे, असे मत विदयार्थी प्रिय शिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी व्यक्त केले.
पुष्प विद्यालयातीत विदार्थांसाठी आयोजित केलेल्या सण आणि त्यांचे महत्व या विषयावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यध्यपक संतोष पागी, दिनेश घोडी,शैलेश पाटील, राजू लहागे आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्कृती संवर्धनासाठी सण हे आवशयक असून त्यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण सुलभ होते.त्यासाठी अन्य प्रांतातील सणवार आणि संस्कृतीची ओळख करून घेणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.
सण हे आनंद आणि मांगल्याचे प्रतिक असल्याने हीच एकतेची भावना हेच आपल्या देशाचे शक्तिस्थान आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
प्रत्येक सणाला स्वतःचे वेगळेपण असून त्याची नाळ भारतीय संस्कृतीशी जोडलेली आहे, असे पागी यांनी सांगितले.