.औसा दि१३ :- औसा तालुक्यातील तपसे चिंचोली जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी भाऊबहिणी च्या अतूट नात्याचा सण अनोखे रक्षाबंधन साजरे करण्याच्या हेतूने शाळेत आकर्षक राख्या बनवल्या आहेत.घरगुती पध्दतीने बनवलेल्या या राख्याने चिंचोलीकरांचा रक्षाबंधन हा सण अधिकच आकर्षक ठरणार आहे.
बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असणाऱ्या राख्या सहज आपल्या गावात उपलब्ध व्हाव्या आणि तसेच विद्यार्थ्यांना आतापासूनच उद्योग क्षेत्रात भविष्यात अग्रेसर राहण्याची गरज आहे हे ओळखून तपसे चिंचोली शाळेतील शिक्षिका संतोषीमाता लोहार यांच्या प्रमुख भूमिकेत शाळेतील विद्यार्थ्यांना कार्यानुभव विषयानिमित्ताने आकर्षक राख्या बनवण्याचा उपक्रम राबविण्यात आला .शाळेतील शिक्षिका संतोषीमाता लोहार मॅडम व सेविका स्वाती बिराजदार यांनी आकर्षक राख्याची माहिती व प्राथमिक साहित्य उपलब्ध करून विद्यार्थ्यांच्या सहकार्याने राख्या बनवल्या आहेत.शाळेतील 5 वी ते 7 वी वर्गातील विद्यार्थी या उपक्रमात मोठया हर्ष उल्हासाने सहभागी होऊन सुंदर राख्या बनवण्यात मग्न झाले होते. राख्यासाठी लागणारे साहित्य आणण्यापासून ते राख्या बनवून राख्याला आकर्षकपणा देऊन सुंदर बनवण्यासाठी शाळेच्या शिक्षिका संतोषीमाता लोहार मॅडम यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांकडून करून घेऊन हा उपक्रम घेण्यात आला.
या राख्याचे वितरण विक्री शाळेत स्टॉल उभे करून विद्यार्थ्यांमार्फ़त विक्री केली करून जमा झालेला निधी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वापरला जाणार असल्याची माहिती शाळेतील शिक्षकांच्या सहमतीने देण्यात आली आहे.
तरी गावातील सर्वच लोकांनी या विद्यार्थ्यांनी आपल्या सुंदर हातांनी बनवल्या या राख्या घेऊनच रक्षाबंधन सण साजरा करावा असे आवाहन शाळेमार्फत करण्यात आले आहे.जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी सुद्धा आकर्षक व्यावसायिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहेत हे चिंचोली शाळेतील विद्यार्थ्यांनी करून दाखवून दिले आहे.
या उपक्रमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराचे ज्ञान आतापासूनच मिळत आहे.
त्यांच्या या उपक्रमाला साथ हवी आहे ती आपल्या सर्वांच्या सहकार्याची.या उपक्रमाच्या यशस्वीते साठी शाळेतील मुख्याध्यापक मोहनराव मोरे, शिक्षक सिद्धेश्वर आयरेकर,देवानंद कोंडमगिरे, प्रदीप इज्जपवार, धर्मराज भिसे, अशोक पवार,अनुराधा कनामे (मॅडम) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
लातूर प्रतिनिधी:- प्रशांत नेटके