आज आपण जाणुन घेणार आहोत राज्यातील पहिला क्रमांक असणार्या अक्कलकुवा मतदारसंघा विषयी
२०१४ विजयी उमेदवार के .सी.पाडवी (कॉंग्रेस) – 64,410 मते
पराभूत उमेदवार : विजयसिंग पराडके (राष्ट्रवादी) 48,635 मते
महाराष्ट्र राज्यातील विधान सभेतील २८८ पैकी पहिला क्रमांकाचा मतदारसंघ म्हणजे अक्कलकुवा मतदार संघ. हा मतदारसंघ नंदुरबार जिल्ह्य़ातील आहे. या मतदारसंघाची संघाची दुसरी ओळख म्हणजे आदिवासी समाज हा मोठ्या प्रमाणात आहे. डोंगर भागात हा मतदारसंघ आहे. 1995 पासून आमदार के सी पाडवी या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत
केसी पाडवी यांना मानणारा वर्ग
1995 साली केसी पाडवी यांनी अक्कलकुवा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि त्यात विजयी झाले. त्यानंतर या मतदारसंघाचे चित्र पालटले. तेव्हापासून या मतदारसंघात त्यांना कुणी पराभूत करु शकले नाही. अनेकदा त्यांना जास्त उमेदवारामुळे मतविभाजनाचा फायदा झाल्याचे दिसून येते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसकडून आमदार के.सी पाडवी यांनी उमेदवारी दिली होती. यावेळेस त्यांचे मताधिक्य कमी झाल्याचे दिसून आले. त्यांना आपल्या मतदारसंघात अवघ्या 279 मंताची आघाडी मिळाली होती. त्यामुळे आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर पाहण्यास मिळेल.
समस्या
अक्कलकुवामतदारसंघ सातपुड्याचा दऱ्या खोऱ्यात असल्याने या मतदारसंघातील समस्या अधिक आहेत. याठिकाणी बऱ्यापैकी रस्ते आरोग्य शिक्षण या सुविधा पोहोचल्या आहेत. मात्र अजून बराचसा भाग भौगलिक परिस्थितीमुळे अजून अनेक समस्या आहेत. त्या सोडण्यासाठी प्रयत्न होत आहेत, मात्र त्या अजूनही पूर्ण झाल्या नाहीत, असं चित्र या भागात पाहण्यास मिळत आहे.
मतदारांची संख्या
अक्कलकुवा मतदारसंघातील एकूण 2 लाख 72 हजार 972 मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 37 हजार 522 पुरुष तर 1 लाख 35 हजर 449 स्त्री मतदार आहेत.