पुणे दि,२४:- पुणे शहरातील श्री देवी चतुःशृंगी मंदिर हे एक जागृत देवस्थान असून काही वर्षापासून येथे नवरात्र उत्सव हा पारंपारिक पद्धतीने होत होता परंतु आता तिथे जागा अपुरी पडल्यामुळे आता फक्त पान फूल हेच बघायला मिळत आहे
नवरात्र उत्सव दि. २९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०१९
घटस्थापना रविवार दि. २९ सप्टेंबर २०१९ सकाळी ७.३० वाजता
सकाळी ६ ते ९ अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करणे
दररोज सकाळी १० व रात्री ९ वा. महाआरती
गणपती मंदिरात रोज दुपारी भजने
सोमवार दि. ७ ऑक्टोबर २०१९ रोजी रात्री ९.३० वाजता नवचंडी होम
मंगळवार ८ ऑक्टोबर दुपारी ५ पासून सिमोल्लंघनाची पालखी मंदिरापासून बँड, ढोल, झेलीम, नगारा, चौघडा, भुते, वाघ्या मुरळीसह, देवीच्या सेवेकर्यांचा सहभाग हेलिकॉप्टरमधून देवीवर पुष्पवृष्टी
श्री अभिषेक अरुण अनगळ या वर्षीचे सालकरी
पौरोहित्य श्री नारायण कानडे गुरुजी
नवरात्र उत्सवानंतर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु करणार, यात सरकता जीना ची सोय उपलब्ध करणार. त्यामुळे वृद्ध, अपंग यांना देवीच्या दर्शनाचा लाभ मिळणार
यंदाच्या नवरात्र उत्सवात स्तनपान कक्षाची व्यवस्था श्री देवी चतुःशृंगी मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आली आहे
श्री देवी चतुःशृंगी मंदिर ट्रस्टतर्फे सांगली व कोल्हापुर जिल्हातील पुरग्रस्तांसाठी रु. ३,००,०००/- ची देणगी मु’यमंत्री रिलीफ फंडाला देण्यात आली
पूजा व प्रसाद साहित्याचे पाच स्टॉल
पोलीस, होमगार्ड, खाजगी सुरक्षा रक्षक, मंदीरात बंदुकधारी सुरक्षा रक्षक
व्यवस्थापन सहाय्यासाठी अनिरुद्ध सेवा केंद्राचे १५० स्वयंसेवक
सुरक्षिततेसाठी २० सीसीटीव्ही कॅमेरे
महानगर पालिकेमार्ङ्गत किटनकनाशकांची फवारणी, कचरा उचलणेसाठी जादा कंटेनरची व्यवस्था, पाण्यात जंतुनाशके टाकणे
ग्रीन हिल्स ग्रुपच्या सहकार्याने निर्माल्याचे खत निर्माण करण्याचा प्रकल्प
अग्निशामक दलाची गाडी (घटस्थापना ते दसर्यापर्यंत)
२४ अवर्स सर्व्हिसेसतर्फे भाविकांसाठी रुग्णवाहिका ठेवण्यात आली आहे. युवराज तेली मेमोरिअल ट्रस्ट तर्फे cardiac ambulance ची सोय करण्यात आली आहे. तसेच ८ तासाच्या ड्युटीमध्ये ६ डॉक्टर असे २४ तासात १८ डॉक्टर भाविकांच्या सेवेला असणार आहेत. औषधोपचार मोङ्गत दिले जाणार आहेत.
पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या मेदानावर विनामूल्य पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
भाविकांना दर्शन घेऊन लवकरात लवकर बाहेर पडता यावे यासाठी बॅरिकेटची व्यवस्था
मंदिर परिसरात रंगरंगोटीची कामे अंतिम टप्यात
मंदिर परिसरात विद्युत रोषणाई, लाईट गेल्यास जनरेटरची व्यवस्था
सर्व भाविकांचा यात्रेसह संपूर्ण वर्षाचा रुपये दोन कोटीचा मंदिराच्या परिसरात विमा
यात्रेतील रांगेत उभे रहाणार्या भक्तांसाठी पिण्याचे पाणी देण्याची व्यवस्था
यंदा पुरूषांसाठीचे सार्वजनिक स्वच्छतागृहाचे पूर्ण नूतनीकरण करण्यात आले आहे.
यंदा मंदिराच्या मुख्य गाभार्यात चांदीचे छत बसविण्यात आले आहे