टेंभुर्णी दि, २७ (प्रतिनिधी):-माढा तालुक्यातील सापटणे(टें)येथील एका २१ वर्षीय तरुणीचे स्वतः सोबत चे फोटो सोशल मिडिया मध्ये व्हायरल करून तिचे दोन वेळा जमलेले लग्न मोडल्याने अविनाश सुळे रा. सापटणे(टें)याच्या विरोधात टेंभुर्णी पोलिसठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन .
याबाबत टेंभुर्णी पोलिसांकडून सविस्तर मिळालेली माहीती अशी की सापटणे येथील २१ वर्षीय तरुणी तिची मैत्रीण कोमल सुळे व तिची भाऊजी रूपाली सुळे व आरोपी अविनाश सुळे यांचे बरोबर घरगुती संबंध असल्याने भिमानगर येथील उजनी धरणा वरती फिरण्यासाठी गेल्यानंतर त्यावेळी अविनाश याने त्याच्याकडील मोबाईल मध्ये त्या तरुणी बरोबर सेल्फी फोटो काढले होते त्या फोटोमध्ये फेरफार करून गाणे डबिंग करून सदर चे फोटो त्या मुलीच्या नातेवाईकाकडे सोशल मीडियाद्वारे पाठवले त्या फोटोचा गैरवापर करून तरुणीचे दोन वेळा जमलेले लग्न मोडणेस कारणीभूत ठरल्याने अविनाश सुळे याच्यावरती टेंभुर्णी पोलिसठाण्यात भा दं वि ४२०, ६६/६६ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन.पुढील तपास पो.नि.राजेंद्र केंद्रे करीत आहेत
अनिल भागवत जगताप मु.पो.टेंभुर्णी ता.माढा जि सोलापुर प्रतिनिधी