पुणे दि ११ :- पुणे शहरातून आज सकाळी अकरा वाजता ट्रेनची व्यवस्था झाल्याची आल्यानंतर तातडीने आज ३७५ परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळगावी म्हणजेच गोरखपूरला वारजे पोलिसांनी संध्याकाळी रवाना केले.सह्याद्री कुस्ती संकुलाचे विजय बराटे, स्वयंसेवक निखील दुर्गे व सागर लाड यांनी परप्रांतीयांसाठी ४०० पाण्याच्या बॉटल ची तातडीने
व्यवस्था केली.तसेच गुडविल इंडिया चे कालिदास मोरे यांनी अवघ्या दोन तासात त्यांच्यासाठी ४०० पॅकबंद जेवणाची व्यवस्था केली.मनपाच्या १९ बसेस याकामी उपलब्ध झाल्या व संध्याकाळी या बसेस पुणे रेल्वे स्थानकाकडे रवाना झाल्या.पोलीस उपायुक्त गायकवाड मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त चव्हाण सो यांनी जातीने हजर राहून व्यवस्थेची पाहणी केली.वपोनि अशोक कदम सो, पोनि मराठे सो, सर्व अधिकारी कर्मचारी व विशेष पोलीस अधिकारी यांनी याकामी अथक परिश्रम घेतले.सदर मजुरांनी जाताना “महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद” च्या घोषणा दिल्या व टाळ्या वाजून अभिवादन केले