पुणे दि ०८ :- घरमालक आई-वडिलांना रूग्णालयात घेउन गेल्याची संधी साधून तब्बल १४ लाख ९३ हजार ५०० रूपये किंमतीचे दागिने चोरणाऱ्या मोलकरणीला हडपसर पोलिसांनी अटक केले. तिच्याकडून 28 तोळे दागिने जप्त करण्यात आले आहेत. बंगारेव्वा चंद्रम हराळे (29, रा. चडचण, कर्नाटक) असे अटक केलेल्या मोलकरणीचे नाव आहे. याप्रकरणी विजय फराटे (33, रा. गाडीतळ, हडपसर ) यांनी फिर्याद दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी फिर्यादी विजय त्यांच्या आई-वडिलांना तपासणीसाठी दिनाआथ मंगेशकर रुग्णालयात घेऊन गेले होते. त्यावेळी घरात काम करीत असलेली मोलकरीण बंगारेव्वा हराळे हिने १४ लाख ९३ हजार ५०० रूपये किंमतीचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी हडपसर पोलीस तपास करीत असताना, संबंधित मोलकरीण कोल्हापूर, सिंधुदुर्गमध्ये जाऊन पुन्हा पुण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलीस शिपाई निखील पवार यांना मिळाली.त्यानुसार पोलिसांना सापळा रचून बंगारेव्वाला ताब्यात घेतले. तिच्याकडून १४ लाख ९३ हजार ५०० रूपये किंमतीचे २८ तोळ्याचे दागिने जप्त करण्यात आले. ही कामगिरी.नामदेव चव्हाण , अप्पर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व. नम्रता पाटील , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ५ पुणे शहर . यांचे मागदर्शनाखाली.कल्याणराव विधाते , सहाय्यक पोलीस आयुक्त , हडपसर विभाग पुणे , बाळकृष्ण कदम , वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड , पोलीस उप निरीक्षक सौरभ माने , पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे , पोलीस नाईक नितीन मुंडे , सैदोबा भोजराव , समीर पांडुळे संदिप राठोड , अविनाश गोसावी पोलीस शिपाई शशिकांत नाळे , अकबर शेख , शाहीद शेख , प्रशांत टोणपे , सचिन जाधव , प्रशांत दुधाळ , निखील पवार , यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे .