२१६ कोटीची फसवणूक करणारी आंतरराज्य टोळीस पुणे शहर सायबर पोलीसांनच्या जाळ्यात » Telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
  • Login
  • Register
telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result
Home वधू

२१६ कोटीची फसवणूक करणारी आंतरराज्य टोळीस पुणे शहर सायबर पोलीसांनच्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
16/03/2021
in वधू
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
22
VIEWS

पुणे दि १७ :- बँकेमध्ये असलेल्या डोरमंट (निष्कीय खाते) खात्यांचा डेटा मिळवून त्याद्वारे अब्जावधीची फसवणूक करणारी आंतरराज्य टोळीलापुणे शहर सायबर पोलिसांनी जेरबंद केले आहे. याप्रकरणात सायबर पोलिसांनी एका महिलेसह ८ जणांना अटक केली आहे. रवींद्र मंकणी यांचा पुत्र रोहन मंकणीचाही त्यात समावेश आहे.रोहन रवींद्र मंकणी (वय ३७, रा. सहकारनगर), सुधीर शांतीलाल भटेवरा ऊर्फ जैन (वय ५४, रा. सिहंगड रोड), रवींद्र महादेव माशाळकर (वय ३४, रा. अंबाजोगाई रोड, बीड), आत्माराम कदम (वय ३४, रा. मुंबई), मुकेश मोरे (वय ३७, रा. येरवडा), राजेश ममीडा (वय ३४, रा. हैदराबाद), विशाल बेंद्रे (वय ४५, रा. वाशीम)राजेश मुन्नालाल शर्मा (वय ४२, रा. औरंगाबाद) परमजित सिंग संधू (वय ४२, रा. औरंगाबाद) व अनघा मोडक (वय ४०, रा. वडगाव बुद्रुक) अशी आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी पुणे. शहर पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार फसवणूक व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींपैकी ४ जण आयटी इंजिनिअर आहेत. या सर्वांनी संगनमत करुन आयसीआयसी, एचडीएफसी व इतर बँकेतील डोरमंट खात्याचा डेटा मिळविला. या सर्व बँक खात्यात जवळपास २अब्ज १६ कोटी २९ लाख रुपये होते. ही माहिती चोरल्यावर ते एका व्यक्तीला विकणार होते. त्यांची माहिती सायबर पोलिसांना मिळाली. गेले काही दिवस पुणे शहर सायबर पोलीस त्यांच्या मागावर होते. ते महर्षीनगर येथील नयनतारा हाईटस येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक गोरे यांना मिळाली. बातमीची खातजमा करुन पोलिसांनी तेथे सापळा रचला. काही वेळात तेथे एका कारमधून एक तरुण आला. त्यानंतर काही वेळाने आणखी पाच पुरुष व एक महिला आली.पोलिसांनी सर्वांना जागेवरच ताब्यात घेतले. त्यांच्याकडे २१६ कोटी २९ लाख ३४ हजार २४० रुपयांची शिल्ल्क असलेल्या बँक खात्यांचा डाटा मिळाला. रोहन रवींद्र मंकणी याने हा डाटा घेऊन पैसे देणारी व्यक्ती सिंहगड रोडवर राहणार असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलीस सिंहगड रोडवरील इमारतीत गेले. तेथे रोहन मंकणी याने सुधीर शांतीलाल भटेवरा हा पैसे देणार आहे, अशी माहिती दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५ लाख रुपये जप्त करण्यात आले. या सर्वांकडून ११ मोबाईल फोन, रोख २५ लाख रुपये, २ कार व एक मोपेड असा तब्बल ४३ लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.व गुजरात येथुन आलेले दोन इसमांना मुंबई येथे पोलीस पथक पाठवुन तेथील रेल्वे स्टेशन वरुन ताब्यात घेतले आहे . सदर कारवाई मध्ये नमुद आरोपीतांकडुन आयसीआयसीआय व एचडीएफसी बँकेतील तसेच इतर बँकेतील डॉरमंट अकाऊंट ( निष्क्रीय खाते ) चा रु २१६,२ ९ , ३४,२४०.८७ ( दोन अब्ज सोळा कोटी , एकोणतीस लाख , चौतीस हजार , दोनशे चाळीस रु सत्याऐंशी पैसे . ) अशी शिल्लक रक्कम असलेल्या बँक अकाउंटचा डेटा तसेच ११ मोबाईल फोन , दोन चारचाकी वाहने , एक स्कुटर व रोख रक्कम २५ लाखा अशी सर्व एकुण ४३,५४,००० / – रु एवढया किमतीची मालमत्ता ताब्यात घेतली व बँकेमध्ये असलेल्या डोरमंट खात्यांचा गोपणीय डेटा अनधिकृतरित्या मिळवुन त्याव्दारे अब्जावधी रुपयांची फसवणुक करणा – या आंतरराज्य टोळीस सायबर पोलीस स्टेशन , पुणे शहर कडील पोलीसांनी जेरबंद केले असुन त्यांचे विरोधात सायबर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदरची कारवाई.अमिताभ गुप्ता , पोलीस आयुक्त , पुणे शहर , रविंद्र शिसवे , सह पोलीस आयुक्त , पुणे शहर ,अशोक मोराळे , अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , भाग्यश्री नवटके , पोलीस उपआयुक्त , आर्थिक व सायबर गुन्हे , डॉ.शिवाजी पवार , सहायक पोलीस आयुक्त , आर्थिक व सायबर गुन्हे , यांचे मार्गदर्शनाखाली व.पो.नि राजकुमार वाघचवरे , पोनि.कुमार घाडगे , पोनि महादेव कुंभार , पोउपनि सागर पडवळ , अमित गोरे , अनिल डफळ अंमलदार संदेश कणे , नितेश शेलार , प्रसाद पोतदार , नितीन चांदणे , अनिल पुंडलीक , नवनाथ जाधव शुभांगी मालुसरे , ज्योती दिवाणे या पोलीस पथकाने कारवाई केली आहे

Previous Post

पुणेकरांनो सावधान पुणे महानगरपालिका व पोलिसांनी पुन्हा सुरू केेली मास्कची कारवाई

Next Post

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील दोघा सराईत गुन्हेगारांना अटक !

Next Post

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील दोघा सराईत गुन्हेगारांना अटक !

Please login to join discussion
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us