महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ महामंडळाच्या पर्यटक निवासातील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण » Telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
  • Login
  • Register
telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result
Home ठळक बातम्या

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ महामंडळाच्या पर्यटक निवासातील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
19/03/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
22
VIEWS

पुणे दि १९ :-  संपुर्ण जग कोरोना पासुन सावरण्याच्या तयारीत असताना पुनश्च: कोरोना व्हायरस चा नवा विषाणु दरवाजे ठोठावत आहे. सध्या कोरोना मुळे रुग्ण संख्या वाढत असली तरी लसीकरणामुळे कोरोनावर मात करणे शकय झााले आहे. शासनाने कोरोना विरोधात कंबर कसली असुन लसीकरणासाठी जय़यत तयारी झाली मोठया प्रमाणावर लसीकरण करण्यात येत आहे. शासनाकडुन देण्यात येणारी लस ही संपुर्णपणे सुरक्षित असुन लसीकरणाचे फायदे दिसुन येत आहेत.

दरम्यान, रुग्ण संख्या वाढीमुळे पुनश्च: पर्यटक साशंक झाले आहेत. तथापि, सदर बाबत कोणतीही शंका मनात गृहीत न धरता योग्य ती खबरदारी घेवुन पर्यटन करण्यास, निसर्गाचा आनंद घेण्यास काहीच हरकत नाही. महाराष्ट् पर्यटन विकास महामंडळाची पुणे विभागातील सर्व पर्यटक निवासे सुरु असुन कोरोनामुळे सर्व आवश्यक असलेली खबरदाी घेवुन पर्यटकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी सज्ज आहेत.

कोरोना विरोधातील लढाईचा एक भाग म्हणुन सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. जवळपास पर्यटक निवासातील कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण पुर्ण झाले असुन आजअखेर एकही कोरोना बाधीत महामंडळाच्या पर्यटक निवासात निदर्शनास आलेला नाही.

पर्यटक निवासे आणि उपहारगृहे यांचे नव्याने निर्जंतुकिरण करण्यात आले आहेत. उपहारगृह आणि अनुषंगिक बाबींची काटेकारेपणे स्वच्छता आणि निर्जंतुकिकरण करण्याबरोबरच शरिराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे, ऑक्सीमिटर, मुखपटटी, हातमोजे अशी व्यवस्थाही करण्यात आली होती. येणाऱ्या पर्यटकांना तातडीच्या वैद्यकिय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

टाळेबंदीमुळे कंटाळलेल्या पर्यटकांना पर्यटन विषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहीती, आसपासच्या निसर्गाची माहीती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली, तसेच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, सुरक्षिततेच्या उपाययोजनायांची माहीत वेबसाईट, फेसबुक आणि Whats app ग्रुप च्या माध्यमातुन देण्यात येत आहे.

पर्यटक निवासे आणि उपहारगृहे निर्जंतुकिरण करण्यात आल्या आहेत. उपहारगृह आणि अनुषंगिक बाबींची काटेकारेपणे स्वच्छता आणि निर्जंतुकिकरण करण्याबरोबरच शरिराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे, ऑक्सीमिटर, मुखपटटी, हातमोजे अशी व्यवस्थाही करण्यात आली होती. येणाऱ्या पर्यटकांना तातडीच्या वैद्यकिय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

‘एमटीडीसी तर्फे वर्क फ्रॉम नेचर’

मोफत वायफाय झोन ; निसर्गाच्या सानिध्यात करता येणार ऑनलाईन काम…

वाढत्या कोरोना रूग्ण संख्येमुळे पुनश्च: टाळेबंदी लागण्याची शक्यता कमी असुन सर्व पर्यटन क्षेत्रे सध्या खुली आहेत. निसर्गरम्य असलेल्या महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये सध्या कोरोना बाबतची सर्व खबरदारी घेवुन डेस्टीनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शुट यांना बहर आला आहे. एम. टी. डी. सी. ची सर्वच पर्यटक निवासे ही मनोहारी समुद्रकिनारे, ऐतिहासिक ठिकाणे, निसर्गरम्य डोंगर रांगा आणि थंड हवेच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे सदरच्या ठिकाणी डेस्टीनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शुट, रिसेप्शन म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच आहे. प्रत्येकजण आपल्या आयुष्यातील अनमोल क्षण कायमस्वरुपी यादगार करण्यासाठी एम. टी. डी. सी. च्या निसर्गरम्य पर्यटक निवास आणि परिसरात येत आहेत. महामंडळानेही अशा हौशी पर्यटकांसाठी सवलती जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात डेस्टीनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शुट, रिसेप्शन फोटोशुट, कार्पोरेट कंपन्यांच्या बैठका आणि “वर्क फ्रॉम नेचर” यांना महामंडळाच्या पर्यटक निवासामध्ये खास सवलत देण्यात येणार असल्याने पर्यटकांमध्ये उत्साही वातावरण आहे.

“वर्क फ्रॉम नेचर” आणि “वर्क विथ नेचर”

वाढत्या कोरोना रूग्ण संख्येमुळे आयटी आणि इतरही कंपन्यांकडुन नव्याने “वर्क फ्रॉम होम” जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कंटाळलेल्या कर्मचाऱ्यांना आणि खाश्या पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेत काम करता यावे, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी ) पर्यटनस्थ्‍ळावरील रिसॉर्टमध्ये मोफत वायफाय झोन सुविधा दिली आहे. त्यानुसार ‘वर्क फ्रॉम होम’ च्या धर्तीवर “वर्क फ्रॉम नेचर” आणि “वर्क विथ नेचर” अशी संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या पर्यटनस्थ्‍ळावरून काम करीत पर्यटनाचा आनंद व्दिगुणि‍त करीत आहेत. टप्प्याटप्प्याने राज्याभरातील ‘एमटीडीसी’ च्या सर्व रिसॉर्टवर अशी सुविधा होणार आहे.
कार्यालयातील कर्मचारी वर्गालाही एकाच वातावरणात सतत काम करून मानसिक थकवा येतो. त्यांच्या क्रयशक्तीवरही परिणाम होतो. नोकरदारवर्गाची जशी अडचण होते तशीच अडचण विविध प्रकल्पांवर काम करणारे अधि‍कारी, गुंतवणूकदार किंवा व्यापारी, उदयोजकांचीही होते. अशा सर्वच घटकांना निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेत कामही करता यावे, यासाठी महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या रिसॉर्टवर वायफाय झोन ची सुविधा दिली आहे.
चार-पाच दिवसांची सुटी घेत रिसॉर्टवर जाउन ठराविक वेळेत काम व उर्वरित वेळेत पर्यटनाचा आनंद घेणे शक्य आहे. या सुविधेमुळे कामात येणारे अडथळे दूर होण्यास मदत होईल. याशि‍वाय रोज त्याच त्या ठिकाणी बसून काम करण्याचा आलेला कंटाळा घालवून निसर्गाच्या सानिध्यात राहून चांगले काम करता येणे शक्य होणार आहे.

“महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) राज्यातील विविध रिसॉर्टवर वायफाय सुविधा दिली आहे. यात पर्यटन झोनवरील सुविधा मोफत आहेत, तर एखादया पर्यटकाला त्याने मागणी केल्यास त्याच्या निवासी कक्षातही अशी सुविधा देण्यात येईल. अशी सुविधा पहिल्या टप्प्यात कोयनानगर, माथेरान, महाबळेश्वर येथे झाली आहे. यापुढील टप्प्यात तारकर्ली, गणपतीपुळे, माळशेजघाट, पानशेत येथील रिसॉर्टवर ही सुविधा होईल. तथापि, पर्यटकांना कोरोना ची धास्ती न घेता महामंडळाच्या पर्यटक निवासात यावे. या ठिकाणी पर्यटकांना सर्व सुविधा आणि कोरोना बाबतची योग्य ती सर्व खबरदारी घेतल्याचे दिसुन येईल. सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण केल्याने निसर्गाचे भान ठेवुन आणि कोरोना बाबत दक्षता घेवुन बिनधास्त पर्यटन करावे.-दिपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पुणे’.

Previous Post

कमी भावात सोने देतो असे आमिष दाखवून लुटणारे दोन महिला परभणी पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

आर्थिक मदतीचे आमिष बनावट मेसेजला बळी पडू नये श्रीमती ए.एस.कांबळे

Next Post

आर्थिक मदतीचे आमिष बनावट मेसेजला बळी पडू नये श्रीमती ए.एस.कांबळे

Please login to join discussion
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us