कर्जत,दि.१७ :-कर्जत तालुक्यातील बारडगाव येथील युनियन बँक ऑफ इंडीयाचे कर्मचारी सुरज सुखदेव सोळसे, वय २८ वर्ष, पद विशेष सहाय्यक हे सकाळी १०:३०वाजता बँकेच्या वाहनाने कर्जत शाखा येथे जाऊन ५० लाख रुपये विड्राल करून कॅश गाडीत ठेवुन गाडी चालु केली असता एक अनोळखी लहान मुलाने जवळ येऊन सांगितले कि, तुमच्या गाडीचे खाली ऑईल गळत आहे.दरम्यान गाडीतुन ऑइल येऊ शकत नसल्याबाबत सोळसे यांना विश्वास होता.हा काही तरी बनाव आहे हे लक्षात येताच सुरज सोळसे यांनी सतर्कपणा दाखवत कॅश पुन्हा बँकेत जमा केली आहे. सुरज सोळसे यांच्या सतर्कतेमुळे ५० लाख रुपयाची लुट थांबली आहे.त्याबद्दल कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सत्कार केला असुन कर्जत मधील जनतेला आव्हान केले आहे की, कोणी ऑईल गळत आहे, गाडीचे टायर पंक्चर झाले आहे,गाडीच्या चाकात हवा कमी आहे इत्यादी कारणे सांगुन रोख रक्कम चोरटया कडुन लुटण्याचे प्रकार होत आहे. तरी जनतेने सतर्कता बाळगावी असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कर्जत येथील नागरिकांना केली आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे