पुणे, दि.१८ :- पुणे शहर व पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील आणि विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे तसेच दोन्ही आयुक्तालयाकडून मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या गायकवाड बाप-लेकास आज पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे.
मोक्का लावल्यानंतर काही तासाच्या आत पोलिसांनी गायकवाड बाप-लेकास अटक केली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर पोलिसांच्या पथकानं ही कारवाई केली आहे.
गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड आणि नानासाहेब शंकर गायकवाड (दोघे रा. आय.टी.आय. रोड, औंध) अशी अटक केलेल्यांची नाव आहे.नानासाहेब गायकवाड हे मोठे उद्योजक आहेत तर गणेश गायकवाड हा एका पक्षाचा पदाधिकारी होता. त्याला राजकीय पक्षानं पक्षातून काढून टाकलं आहे.गणेश गायकवाड आणि नानासाहेब
गायकवाड यांच्याविरूध्द सुनेच्या छळ केल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.स्वतःस व इतर साथीदारांस आर्थिक फायदा मिळविण्या साठी पिडीत व्यक्तिस अवैधरीत्या व्याजाने पैसे देवून ते वसूल करण्यासाठी रीव्हॉल्व्हरचा वापर करून , हवेत गोळीबार करून , जिवे मारण्याचा प्रयत्न करून , हिंसाचार करणेची धमकी देवून आणि धाकदपटशा दाखवून जबरदस्तीने जमीनीच्या मालकी बाबतचे दस्तऐवज स्टॅम्प पेपर , लिहलेले व कोरे पेपरवर सहया व अंगठे घेणे अशा प्रकारच्या गुन्ह्याच्या पद्धतींची माहीती मिळाली आहे . त्यामध्ये व्याजाचे व्यवसायातुन लोकांच्या जागा व वाहने बळकावल्याची माहीती प्राप्त असुन अशा व्यवहारांतुन मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी संपत्ती जमावल्याचा
त्यानंतर इतर काही पोलिस ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात देखील गायकवाड बाप-लेकावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गायकवाड बाप-लेकासह इतरांविरूध्द मोक्काअंतर्गत कारवाई केली होती.मोक्काअंतर्गत कारवाई केल्यानंतर काही तासातच गणेश आणि नानासाहेब गायकवाड यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
सहाय्यक पोलिस आयुक्त बजरंग देसाई आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली असल्याची माहिती मिळत आहे.पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गायकवाड यांना अटक करण्याचे आदेश यापुर्वीच दिले होते.
गायकवाड बाप-लेकास ताब्यात घेण्यात आलं असून त्यांना कायदेशीरबाबी पुर्ण करून पुण्यात आणण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.