पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुका ठरल्यावेळीच होण्याचे संकेत » Telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
  • Login
  • Register
telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result
Home ठळक बातम्या

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुका ठरल्यावेळीच होण्याचे संकेत

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
22/08/2021
in ठळक बातम्या, राजकीय
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
216
VIEWS

पुणे,दि२२:- पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुका फेब्रुवारी 2022 मध्ये होणार असल्याचे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात दिले. तर, समाविष्ट 23 गावांनंतर नवीन महापालिकेच्या निमिर्तीबाबत बोलताना पुणे मनपाच्या निवडणुका फेब्रुवारीत होणार असल्याने नवीन महापालिका शक्‍य नसल्याचे पवार म्हणाले.तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतही पवार यांनी मुंबई वगळता अद्याप राज्यातील इतर महापालिकांची प्रभाग रचनेबाबत महाविकास आघाडीत चर्चा झालेली नाही. पण, निवडणुका मात्र फेब्रुवारी 2022 मध्येच नियोजित वेळेतच होतील, असे सांगितले आहे.
दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाने राज्यातील फेब्रुवारी 2022 मध्ये मुदत संपलेल्या नगर परिषदा तसेच नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी एकचा वॉर्ड गृहीत धरून त्यानुसार वॉर्ड रचनेचा कच्चा आराखडा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिका प्रभाग रचनेबाबतही पुढील आठवड्यात आदेश अपेक्षित असल्याचे प्रशासनातील सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पुणे महापालिकेची मुदत मार्च 2022 अखेर संपत आहे. त्यामुळे या निवडणुका जानेवारी-फेब्रुवारीत होणे अपेक्षित आहे. मात्र, राज्यात गेल्या दीड वर्षांपासून करोनाचे संकट आहे. परिणामी, अनेक ग्रामपंचायती तसेच काही महापालिकांच्या निवडणुका मागील वर्षी झाल्या नाहीत. त्यामुळे तेथील महापालिकांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर या वर्षांच्या सुरुवातीला ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. मात्र, त्यानंतर लगेचच राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला.
तर तिसरी लाट ऑगस्ट 2021 अखेर येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. तसेच ही लाट ऑक्‍टोबरअखेर राहिल, असाही अंदाज आहे. त्यामुळे राज्यशासन महापालिका निवडणुका सहा महिने पुढे ढकण्याबाबत चर्चा करत आहे. परिणामी, अद्यापही महापालिका निवडणुकांसाठीचे वॉर्ड रचना करण्याचे जाहीर करण्यात आलेले नाही.
मात्र, आता राज्यशासन निवडणुकांबाबत सकारात्मक आहे. या महापालिकांसह मागील वर्षी प्रशासक नेमलेल्या महापालिकांच्या निवडणुका सोबतच घेतल्या जाण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी अद्याप निर्णय जाहीर करण्यात आलेले नसले, तरी महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांकडून स्थानिक पातळीवर निवडणुकीची प्रभाग रचना कशी असावी, संभाव्य उमेदवार, आघाडी झाल्यास जागा वाटपाचे सूत्र कसे असावे याबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यानंतर आता स्वत: उपमुख्यमंत्री पवार यांनीच निवडणुकांबाबत भाष्य करत पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत

Previous Post

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांचे चिमुकल्यांसोबत रक्षा बंधन

Next Post

काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनचा तांदूळ पोलिसांनी पकडला ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनचा तांदूळ पोलिसांनी पकडला ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Please login to join discussion
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us