वर्षा पर्यटनाबरोबरच हिवाळी पर्यटनाचे महामंडळाकडुन नियोजन ….. » Telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
  • Login
  • Register
telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result
Home ठळक बातम्या

वर्षा पर्यटनाबरोबरच हिवाळी पर्यटनाचे महामंडळाकडुन नियोजन …..

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
27/08/2021
in ठळक बातम्या, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
125
VIEWS

कोरोना आणि लॉकडाऊन मुळे त्रस्त झालेल्या लोकांना आणि पर्यटकांना शासनाने काहीसा दिलासा दिला आहे. कोरोना चा प्रभाव कमी होत असल्यामुळे शासनाने टप्प्याटप्याने अनलॉक ची प्रक्रिया सुरु असुन हळुहळु पर्यटन स्थळे अनलॉक होत आहेत. त्याचबरोबर महामंडळाने पर्यटकांसाठी विशेष सवलती जाहीर केल्या असल्यामुळे आगामी काळात आता पर्यटनास बहर येणार आहे.
मागील वर्षी आणि यावर्षीही कोरोना महामारीमुळे घरी राहुन त्रस्त झालेल्या पर्यटकांना आणि लहानथोरांना आता मनमोकळं पर्यटन करता येणार आहे. मागिल काही कालावधीपासुन कोरोनाचा प्रकोप वाढल्याने आधी संचारबंदी आणि मग लॉकडाऊन सुरु झाल्याने पर्यटन बंद होते. पर्यटन स्थळे पर्यटकांविना सुनी पडली होती.
सध्या राज्यात मान्सुन अंतीम टप्प्यात आला असुन सर्वत्र निसर्गानं हिरवी शाल पांघरली आहे. त्यामुळे हिरव्यागार डोंगररांगा आणि निसर्गरम्य समुद्रकिनारे पर्यटकांना खुणावत आहेत. निसर्गाचं मनमोहक रुप मनात साठविण्यासाठी, दऱ्या डोंगरावर भटकंती करण्यासाठी, महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख करुन घेण्यासाठी पर्यटक आसुलेले आहेत. हे सर्व पर्यटक पर्यटनाचा निखळ आनंद घेण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवांसांमध्ये येत आहेत.


याचाच एक भाग म्हणुन वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांचा प्रतिसाद वाढत आहे. तर हिवाळी पर्यटनालाही पर्यटक पसंती देत असल्याचे दिसुन आले आहे. लॉकडावुन मुळे सार्वजनिक प्रवासी वाहतुक ठप्प होती. यात एसटी, रेल्वे वाहतुकही बंद होती. त्यामुळे सक्तीने घरातच बसावे लागलेला वर्ग खुपच कंटाळला होता. हा सर्व वर्ग आता वर्षा पर्यटनाचा तसेच हिवाळी पर्यटनाचा बेत आखत आहे. दमदार पावसामुळे निसर्गाने मनमोहक अशी हिरवाई वाढली आहे. त्यातच आगामी हिवाळी हंगाम येणार असल्याने त्यासाठी आतापासुनच नियोजन पर्यटकांनी सुरु केल्याचे दिसुन येत आहे.
गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी च्या सुटटयांसाठी नोकरदार वर्ग आणि पर्यटन व्यावसायिक ही पर्यटनाचे नियोजन करीत आहेत. त्यासाठी पर्यटन विकास महामंडळानेही जय्यत तयारी सुरु केली आहे. कोरोना नियंत्रणात राहील्यास आक्टोबर, डिसेंबर पासून पर्यटनाचा हंगाम जोरदार सुरु होणार आहे.


हिवाळी पर्यटन हंगामासाठी महामंडळाच्या पर्यटक निवासांचे जोरदार बुकिंग सुरु असल्याचे निदर्शनास येत असल्याने निसर्गरम्य असलेल्या पर्यटक निवासामध्ये गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक ही उत्सुक असल्याचे दिसुन येत आहे. महामंडळानेही हिवाळी पर्यटनासाठी नवनव्या संकल्पना राबविण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. अशा पर्यटकांसाठी अनोख्या सवलती जाहीर केलेल्या आहेत. जेष्ठ नागरिक, शासकिय कर्मचारी यांना आगाऊ बुकिंगसाठी सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. सामाजिक बांध्लिकी जपताना आजी – माजी सैनिक आणि अपंगांसाठी विशेष सवलती दिल्या आहेत. ग्रुप बुकिंगसाठी 20 खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग असल्यास सवलत देण्यात येत आहेत. शालेय सहलींसाठी विशेष सवलती देण्यात येत आहेत. तसेच काही नाविन्यपुर्ण निर्णय घेताना कॉप्लीमेंटरी ब्रेकफास्ट ची सुविधा जाहीर केली आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये मोठया प्रमाणावर आनंदाचे वातावरण दिसुन येत आहे.


मात्र सध्याचे वातावरण पाहता पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देताना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन महामंडळाच्या पर्यटक निवासात करण्यात येत आहे. उपहारगृह, रिझॉर्ट आणि अनुषंगिक बाबींची तसेच परिसराची काटेकारेपणे स्वच्छता आणि निर्जंतुकिकरण करण्यात आले आहे. येणाऱ्या पर्यटकांना तातडीच्या वैद्यकिय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असुन आवश्यकता भासल्यास पर्यटकांच्या मागणीवरुन पर्यटक निवासात औषधेपचार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. शरिराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे अशी व्यवस्था पुर्वीपासुनच करण्यात आली आहे. कोरोना विरोधातील लढाईचा एक भाग म्हणुन कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. महामंडळाच्या उपहारगृहामध्ये गर्दी टाळण्यासाठी पर्यटकांना त्याच्या खोल्यांपर्यंत अल्पोपहार, जेवण आणि अन्य अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. तसेच शासनाच्या सर्व नियमांच्या अधीन राहुन प्री – वेडींग फोटोशुट आणि डेस्टीनेशन वेडींग चीही सोय करण्यात येणार आहे.

“महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची सर्व पर्यटक निवासे सुरु झाली असुन www.mtdc.co या वेबसाईटर ऑनलाईन बुकिंगही सुरु करण्यात आले आहे. आगामी काळात पर्यटकांचा ओढा लक्षात घेवुन मोठया प्रमाणावर सवलती देण्यात येणार असुन पर्यटकांसाठी नाविन्यपुर्ण अशा वर्क फ्रॉम नेचर आणि वर्क विथ नेचर या संकल्पनेअंतर्गत काही रिझॉर्टवर वाय फाय सुविधा पुरविण्यात येत आहेत.श्री. दिपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पुणे

Previous Post

दहीहंडी व गणेशोत्सवासाठी गेल्या वर्षीचीच नियमावली या वर्षीही नियम लागू .

Next Post

पुणे पालिकेच्या वतीने शिवाजीनगर-घोले रोड परिसरात अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई

Next Post

पुणे पालिकेच्या वतीने शिवाजीनगर-घोले रोड परिसरात अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई

Please login to join discussion
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us