पुणे दि,२८ :- पुणे मंडळाच्या वतीने पुणे लोणावळा दरम्यान रेल्वेमार्गाच्या देखभाल, दुरुस्तीचे काम दिनांक ०१.१२.२०१९ पासून ३१.१२.२०१९ पर्यंत दुरुस्तीचे काम होणार आहे. या कालावधी मध्ये इंजीनिअरींग, सिग्नल व ओएचई विभागां कडून विविध तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत . रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे वरील काळामध्ये या मार्गावरच्या दोन लोकल आंशिक स्वरूपात रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्याहुन लोणावळा करीता 13.00 वाजता सुटणारी लोकल संख्या 99818 तळेगांव पर्यंतच जाईल.
लोणावळाहुन पुण्याकरीता 14.00 वाजता सुटणारी गाडी संख्या 99813 तळेगांव स्टेशन येथून आपल्या नियत वेळेत पुण्याकरीता सुटेल. अर्थात ही लोकल लोणावळा- तळेगांव दरम्यान रद्द राहिल.