पुणे दि२८ : – पुणे उपप्रादेशिक परिवहन महामंडळात पुणे आरटीओ कार्यालयाजवळ मालवणतळ इंडस्ट्रीयल इस्टेट इमारतीतील पहिल्या मजल्यावर एजंटकडून बोगस कागदपत्रे सादर करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने बुधवारी अचानक छापे मारत झाडाझडती घेतली होती. त्यात बोगस कागदपत्रे सादर करत असल्याचे समोर आले असून, अनेकांकडून पत्रे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी ६ एजंटवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एजंट श्रीनिवास गुर्रम, आणि साहिर शेख, तसेच बनावट आधारकार्ड प्रकरणात प्रवीण विश्वंभर रायजुबे, (वाघोली), प्रमोद जगन्नाथ ढगे, (शिरूर), साजिद आय. शेख, (कोंढवा), संदीप ज्ञानोबा खुटवड, (भोर) आणि सुनील शहाजी जाचक, (लोणीकंद) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत आरटीओ अधिकाऱ्यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.याप्रकारानंतर आरटीओ कार्यालयासह शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. आरटीओ कार्यालयात दररोज हजारो वाहनांची नोंदणी होते. तसेच अनेक नागरिक येथे वाहन परवाना घेण्यासाठी येत असतात. तर वाहने दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर करण्यात येतात. यासाठी पुरावा म्हणून काही कागदपत्र द्यावी लागतात. परंतु, अनेक नागरिक बाहेरील आहेत. अशावेळी त्यांना कागदपत्र देण्यासाठी अडचणी येतात. यावेळी एजंट जादा पैसे आकारून बनावट कागदपत्रे आरटीओत सादर करून कामे करून देतात. अशी माहिती ती पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ वेंकटेश, पोलीस सह आयुक्त रविंद्र शिसवे, यांनी दिलेल्या सूचनेनुसार व गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून पोलीस आयुक्त बच्चनसिंग सहा पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २७/११/२०१९ रोजी अचानक त्या ठिकाणी छापा मारून कागदपत्रे ताब्यात घेतले होते. त्याची पडताळणी केल्यानंतर बोगस कागदपत्रे आरटीओ कार्यालयात सादर करत असल्याचे समोर आले. त्यानुसार ६ जणांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले आहे. पुढील तपासासाठी बंडगार्डन पोलिसांकडे या ६ जणांना दिले आहे. पोलिसांनी एजंटची झाडाझडती घेतल्यानंतर आरटीओ कार्यालयात चांगलीच खळबळ माजली आहे. या एजंटला कार्यालयातून कोणी मदत करत होते का, याचा तपास ही पोलीस करत आहेत. सदरची कामगिरी गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथक पश्चिम विभाग पुणे शाखा पुणे पथकाने केली आहे