पुणे दि, २९ :- लहान दीर सतत जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलिसांनी दीराला अटक केली.आहे
आरोपी श्रीकांत ऊर्फ बापू बबन वारे (वय २५, रा. मु. पो. पानोलीता. पारनेर, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत बाणेर परिसरातील ५२ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार बालेवाडी येथील सनशाईन पार्क येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारे कुटूंब मुळचे अहमदरनगर जिल्ह्यातील असून, बालेवाडी परिसरात वास्तव्यास आहे. फिर्यादी यांच्या 35 वर्षीय मुलीवर आरोपी श्रीकांतची काही वर्षापासून वाईट नजर होती.तो वारंवार विवाहितेशी जवळीक साधण्याचा व विवाहबाह्य संबंध ठेवण्याची मागणी करत होता. परंतू विवाहितेला श्रीकांतचे वागणे पसंत नव्हते.त्यामुळे त्यातूनच श्रीकांत विवाहितेचा वेळोवेळी शारिरीक व मानसिक छळ करत असे. यातूनच आलेल्या नैराश्यातून तिने विष प्राशन करून आत्महत्या केल्याबाबतचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.व पुढील तपास चतुर्श्रुंगी सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. ए. दहिफळे करीत आहेत.