पुणे दि २७ :-पुणे शहरात चैन चोरीचे गुन्हे करुन धुमाकूळ घालणारे आरोपीला सी.सी.टी.व्ही. फुटेजवरुन पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे दि ०८ रोजी दुपारी १६.३० वा चे सुमारास जेष्ठ महिला नामे मंगला मुरली रा. मधुबन सोसायटी, कळस, पुणे या त्यांचे अॅक्टीवा गाडीवरुन मुलीला भेटण्यासाठी चेस्टरफिल्ड सोसायटी कडे धानोरी गावठाणाकडून जात असताना त्यांचे पाठलाग करून पाठीमागून आलेल्या मोटार सायकलवरील दोन अनोळखी इसमांनी त्यांचे गळयातील दोन तोळे वजनाची किंमत अंदाजे ५० हजार रुपयाची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसका मारुन पळून नेली होती व डोंगराच्या दिशेने पळून गेले त्याबाबत विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाला होता व दाखल जबरी चैन चोरीच्या गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) रविंद्र कदम यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे इंन्चार्ज व स्टाफ हे करत होते. त्यांनी दाखल गुन्हयाचे घटनास्थळी, फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांनी सांगीतलेल्या वर्णनावरुन जबरी चोरी करणारे इसमांनी वापरलेल्या काळ्या रंगाच्यामोटार सायकलचा व अनोळखी इसमांचा ते गेलेले व आलेल्या मार्गाचा अभ्यास करून त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजचा पो ना प्रविण भालचिम व पोशि प्रफुल्ल मोरे यांनीगुन्हा दाखल झाल्यापासून कसोशीने अहोरात्र तपास व आरोपीचा माग काढून तांत्रीक साधनांचा वापर करून केलेले तपासामध्ये सदर आरोपी हे सीसीटीव्ही कॅमेयांनमध्ये घटनास्थळी येत असतानाची प्राथमिक माहिती फुटेजव्दारे प्राप्त झाली व त्यांनी आरोपी आलेल्या मार्गाचा शेवटपर्यंत शोध घेतला असता आरोपी हे भरत ढाबा चौकातुन धानोरी रोडने फिर्यादीच्या मागे येत असतानाचे फुटेज प्राप्त झाले व पोलिसांनी आरोपी आलेल्या मार्गाचा तपास केला असता आरोपी हे खराडी बायपासरोड मार्गे – मुंढवा – एमप्रेस गार्डन – पुणे स्टेशन – जहांगिर चौक – आर.टी.ओ. चौक – पर्णकुटी चौक – चंद्रमा चौक – विश्रांतवाडी चौक – कस्तुरबा सोसा – विश्रांतवाडी चौकातुन –-संभाजी चौक कळस – विश्रांतवाडी चौकातुन धानोरी असे येतानाचे फुटेज प्राप्त झाले त्याअनुषंगाने त्यांचा खाराडी/वाघोली भागात शोध घेत असताना फुटेजमध्ये आरोपींनी वापरलेल्या गाडीचा नंबर एम एच १६ बीडी ३४२१ असा मिळून आला व सदर गाडी एन.पी.आर. कॅमेयात खराडी बायपास रोडलायेताना दिसली व वाघोली परिसरात शोध घेत असता ती वाघेश्वर मंदिराजवळ रोडला पार्क केलेली पोलिसांना मिळाली गाडी मिळाल्यानंतर आरोपी याच भागातील असल्याचे खात्री झाल्याने तपासपथकाच्या टिम पाडून सदर गाडीवरती पाळत ठेवली होती परंतू चाणक्ष आरोपीने ती साथीदार आरोपीच्या मदतीने रात्री अचानक घेवून गेला परंतू त्याच जागेवर होंडा लिओ एम.एच. २९ ए.यु. ६४८४ ही गाडी सोडलेली होती तीची माहिती पोलिसांनी काढली असता ती उमरखेड पोलीस स्टेशन यवतमाळ येथुन चोरीस गेल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली. व आरोपी दोन्ही गाडयांचा वापर करत असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यादोन्ही गाडयांचा तपास पथक टिम शोध घेत असताना पो.ना. प्रविण भालचिम व पो.शि. प्रफुल्ल मोरे यांना गाडी होंडा ड्रीम युगा एम एच १६ बीडी ३४२१ हीचेवर चैन चोरीच्या गुन्हयातील पुर्व रेकॉर्ड वरील आरोपी विक्रम पांडे हा रॅश ड्रायव्हींग करत नगर रोडने खांदवेनगर कडे जात असताना दिसला त्यांनी सोबतचे सर्व स्टाफला बोलावून त्यागाडीचा खांदवेनगर भागात दोन दिवस शोध घेतला व एका मैदानात उभी असल्याचे दिसली तेथेच जवळ होंडा लिओ एम.एच. २९ ए.यु. ६४८४ ही मोटार सायकल देखील लावल्याचे दिसली आरोपी त्या दोन्ही गाडयांचा वापर करत असल्याचे निदर्शनास पोलिसांना आल्याने तपास पथक टिमने गुप्तपणे तीन दिवस सापळा रचून थांबले असता दि 25 रोजी विक्रम पांडे हा गाडी घेण्यासाठी येताना दिसला त्यावेळी तपास टिममधील पोना भालचिम यांनी त्यास ओळखून इशारा केल्यानंतर त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करून लागला व त्याचा पाठलाग करून त्यास व त्याने वापरलेल्या दोन्ही गाडया ताब्यात घेतल्या व त्या गुन्हयाचे तपासकामी जप्त केल्या असून आरोपी विक्रम पांडे यास अटक करून त्याचे साथीदार आरोपी विक्रम जाधव याचा शोध घेवून त्यास देखील ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे. आरोपींनी वरील गुन्हा केल्याचे कबुल केले असून त्यांचेकडून गुन्हयात चोरी केलेली फिर्यादीची सोन्याची चैन जप्त करण्यात आलेली आहे. दाखल गुन्हयाचा अधिक तपास सपोनि निकम हे आमच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. तसेच आरोपींनी आणखीन 3 गुन्हे केल्याचे कबुली दिली आहे त्याबाबत अधिक तपास चालू आहे.सदरची कारवाई सुनिल फुलारी,अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४, मा.लक्ष्मण बोराटे सहा.पोलीस आयुक्त खडकी विभाग, अरुण आव्हाड ़वपोनि विश्रांतवाडी तसेच ़रविंद्र कदम पो नि गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन निकम व तपास पथकाचे अधिकारी पो.उप-निरीक्षक लहु सातपुतेव कर्मचारी विजय सावंत, प्रविण भालचिम, यशवंत किर्वे, किशोर दुशिंग, अझरुददीन पठाण, प्रफुल्ल मोरे, रिहाण पठाण,शेखर खराडे ,संदीप देवकाते, अनिकेत भिंगारे व विशेष पोलीस अधिकारी राज राठोड यांचे पथकाने उत्कृष्ठ कामगिरी केली आहे.