पुणे दि २७ :- हडपसर पोलिसांनी वाहनचोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास पुणे शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे . त्याच्याकडून तब्बल ३ लाख ८५ हजार रूपयांचे ७ चोरीची वाहने हस्तगत करण्यात आली आहेत . त्याने वर्षभरापूर्वी फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारे चोऱ्या केल्या होत्या . या गुन्हयात त्याला जानेवारी महिण्यात जामिन मिळाला होता . यानंतर त्याने पुन्हा चोऱ्यांचे सत्र सुरु केले होते . तो चोरी करताना संशय येऊ नये म्हणून डॉक्टरचे ऍप्रन , स्टेथोस्कोप , ससून रुग्णालयात एमबीबीएस डॉक्टर असल्याचे ओळखपत्र घालत होता . शाहरुख रज्जाक पठाण ( 23 , रा.शेळके मळा , यवत , ता.हवेली , मुळ गाव उदाची वाडी , वनपुरी ता.सासवड ) असे अटक आरोपीचे नाव आहे .पुणे शहरातील वाहन चोरी, जबरी चोरी व घरफोडी चोरीच्या गुन्हयास प्रतिबंध करुन, चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता सुनिल फुलारी, अप्पर पोलीस आयुक्त सोा, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त साो, परिमंडळ 5 पुणे शहर व कल्याणराव विधाते, सहाय्यक पोलीस आयुक्त साो, हडपसर विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे व पोलीस निरीक्षक हमराज कुंभार यांचे सुचनेनुसार हडपसर पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील अधिकारी सपोनि चव्हाण, पोलीस उप निरीक्षक हिमालय जोशी व तपास पथकातील कर्मचारी हे जबरी चोरी, घरफोडी चोरी, वाहन चोरी चोरीच्या गुन्हयांचा तपास करीत असताना पो ना नितीन मुंढे ,पो. ना. विनोद शिवले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे द्राक्ष संशोधन केंद्र पुणे सोलापूर हायवे रोड मांजरी पुणे येथे सापळा लावुन इसम नामे शहारुख रज्जाक पठाण वय 23 वर्षे रा. शेळके मळा, विठठल कामत हॉटेलचे पाठीमागे, यवत ता. हवेली, जि. पुणे मुळगाव स. नं. 257, उदाची वाडी वनपुरी सासवड ता. पुरंदर जि. पुणे यास पकडले असता त्यावेळी इसम नामे शहारुख रज्जाक पठाण याचे ताब्यात होंडा अॅक्टिव्हा गाडी नं. एम. एच. 12 एल. एच. 2632 हि मिळून आल्याने सदर गाडीबाबत चौकशी केली असता त्याने सदरची गाडी ही शेवाळवाडी मांजरी पुणे येथुन चोरी केली असल्याचे कबुल केल्याने त्याबाबत हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. इसम नामे शहारुख रज्जाक पठाण वय 23 वर्षे रा. शेळके मळा, विठठल कामत हॉटेलचे पाठीमागे, यवत ता. हवेली, जि. पुणे मुळगाव स. नं. 257, उदाची वाडी वनपुरी सासवड ता. पुरंदर जि. पुणे यास वरील नमूद गुन्हयात दिन 26 रोजी 16.10 वाजता अटक करण्यात आले आहे. अटक मुदतीत आरोपी शहारुख रज्जाक पठाण याचेकडे केलेल्या तपासादरम्यान त्याने हडपसर, कोंढवा, बंडगार्डन या परिसरामध्ये वाहन चोरी केल्याचे सांगुन आरोपी नामे शहारुख रज्जाक पठाण याने वरील नमूद परिसरातुन वाहन चोरी केलेल्या गाडया मेमोरंडम पंचनाम्याने काढुन दिल्याने ते गुन्हयाचे पुरावेकामी जप्त करुन ताब्यात घेतले आहे.तसेच वरील नमुद आरोपीस यापुर्वी फरासखाना पोलीस स्टेशन येथे अटक करण्यात आली होती त्यावेळी त्याचेकडुन 26 चोरीच्या दुचाकी 3 चारचाकी व 1 टॅम्पो हस्तगत करण्यात आल्या होत्या.सध्या अटक आरोपी हा पोलीस अटकेत असुन त्याचेकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.व अटक आरोपीकडून हडपसर पोलीस स्टेशन कडील वाहन चोरी एकुण 02 गुन्हे व कोंढवा पोलीस स्टेशन कडील 1 गुन्हा तसेच बंडगार्डन पोलीस स्टेशन कडील 2 असे वाहन चोरीचे एकुण 05 गुन्हे उघडकीस आणुन त्याचेकडून एकुण 3,85,000/- रुपये किंंमतीच्या एकुण 07 मोटार सायकली हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कामगिरी मा. सुनिल फुलारी, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा. सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 5 पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली मा. कल्याणराव विधाते, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे, पोलीस निरीक्षक हमराज कुंभार यांचे सुचनानुसार सहा.पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस उप निरीक्षक हिमालय जोशी, सहा. पोलीस फौजदार युसुफ पठाण, पो. हवा. रमेश साबळे, पो. हवा. राजेश नवले, पो. ना. प्रताप गायकवाड, पो. ना. विनोद शिवले, पो. ना. सैदोबा भोजराव, पो. शि. नितीन मुंढे, पो. शि. अकबर शेख, पो. शि. शाहिद शेख, पो. ना. गोविंद चिवळे, पो. शि. शंशिकांत नाळे, पो. शि. प्रशांत टोणपे, पो.शि , नरसाळे, पो शि कांबळे यांनी केली आहे.