पुणे ग्रामीण दि ०८ :- पुणे बारामती शहरात सुरु असलेल्या ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली बेकायदा घेण्यात येणारा जुगार या पाच सेंटरवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकून सात जणांवर कारवाई केली.आहे व बारामती येत ऑनलाईन लॉटरी सेंटरच्या नावाखाली बेकायदा जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरिक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व पोलिस पथकाने नीरज ऑनलाईन लॉटरी सेंटर व दीक्षित ऑनलाईन लॉटरी सेंटर (श्रीराम गल्ली) स्वामी समर्थ स्कील गेम लॉटरी सेंटर व स्कील गेम 2020 लॉटरी सेंटर (भाजी मंडई) तसेच राजश्री लॉटरी सेंटर (खंडोबा नगर) येथे छापे टाकले. या ठिकाणी विनापरवाना ऑनलाईन लॉटरी सेंटरच्या माध्यमातून जुगार खेळला जात असल्याचे पोलिसांना दिसले.या सेंटर्सवरुन ऑनलाईन जुगाराची साधने, संगणक संच, प्रिंटर, वायफाय राऊटर, कागदी चिठ्या, मोबाईल फोन, रोख रक्कम असा 3 लाख 63 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. बेकायदेशीर ऑनलाईन जुगार चालवणारे तुषार माणिक लोंढे व संकेत पुरुषोत्तम दीक्षित (रा. कोष्टी गल्ली बारामती), सुनील अण्णा लष्कर (रा.कुरवली रोड फलटण), हेमंत देशमुख (रा. निरगुडी ता. फलटण), मनोज बबन सोनवले व सतीश विठ्ठल सूर्यवंशी (रा. शंकर भोई तालीम नजिक, बारामती), गोपाल राधाकिशन शर्मा (रा. देसाई इस्टेट बारामती) यांना ताब्यात घेऊन त्यांचेवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.सदरची कारवाई.पोलीस अधीक्षक सो.डॉ. अभिनव देशमुख,
मिलिंद मोहिते अपर पोलीस अधीक्षक सो बारामती, नारायण शिरगावकर उपविभागीय अधिकारी बारामती यांचे आदेशान्वये मा. पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली पोसई/अमोल गोरे, पोसई/शिवाजी ननावरे,सफौ/राजेंद्र थोरात,सफौ/श्रीकांत माळी, पोहवा/अनिल काळे,पोहवा/रविराज कोकरे,पोहवा/रौफ इनामदार,्हवा/ज्ञानदेव क्षिरसागर,
पोहवा/काशिनाथ राजापुरे, पोना/प्रविण मोरे, पोशि/प्रसन्नजीत घाडगे यांनी केलेली आहे.