नवी दिल्ली :– १ जानेवारी २०१९ मध्ये मोदी सरकार मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे. खरं तर नव्या वर्षांच्या सुरुवातीलाच सरकार वरुण मित्र योजना सुरू करत आहे. ज्या योजनेंतर्गत सरकार तुम्हाला तीन आठवड्यांची मोफत ट्रेनिंग देणार आहे. हा उपक्रम मिनिस्ट्री ऑफ MNRE आणि NISEनं आयोजित केला आहे. याला सोलर वॉटर पंपिंग ‘वरुण मित्र’ उपक्रमही संबोधलं जात आहे. या उपक्रमांतर्गत ट्रेनिंगनंतर तुम्हाला चांगली नोकरी मिळणार आहे. विशेष म्हणजे कमी पगार घेणारे लोक जास्त पगार मिळवू शकतात.
ज्या लोकांना बेरोजगारीची समस्या सतावते आहे. तसेच ज्यांना कमी पगार आहे, अशांना मोदी सरकार नवी वर्षात गुड न्यूज देणार आहे.