पुणे.दि 22 :- खेळ आणि तंदुरुस्तीही मानवी जीवनातील एक अत्यंत महत्वाची बाबआहे. खेळ खेळल्याने मानवामध्ये एकीची भावना जागृत होवुन, त्याच्या मध्ये नेतृत्व गुणांसोबतच ध्येय्य निश्चिती आणि धोका स्विकारण्याची मानसिकता निर्माण होत असते. एक सुदृढ व्यक्ति सुदृढ समाज आणि सुदृढ देश निर्माण करण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावत असते. कोणत्याही देशाच्या सर्वांगिण विकासा मध्ये खेळास अनन्य साधारण असे महत्व आहे. गेल्या काही वर्षात भारताने क्रीडा क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत्रदिपक अशी कामगिरी केलेली आहे. भारतीय युवा क्रीडा क्षेत्रात स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी अपार कष्ट घेतांना दिसत आहेत, अशा वेळेसच या युवाशक्तीच्या पाठीमागे खंबिरपणे उभे राहुन त्यांच्यातील कतृत्वाला चालना देणेसाठी त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडासुविधा आणि प्रशिक्षण उपलब्ध दिल्यास भारत देश देखिल क्रीडाक्षेत्रातील महासत्ता म्हणून उदयास येवू शकेल.
यासर्व बाबींचा विचार करुन भारतातील शेवटच्या घटकांपर्यंत क्रीडा संस्कृति निर्माण व्हावी तसेच देशात खेळल्या जाणाऱ्या सर्व खेळांच्या विकासासाठी मजबुत धोरण निर्माण करण्यासाठी मा.पंतप्रधान श्री.नरेंद्रमोदी यांच्या पाठीब्याने व केंद्रीय क्रीडामंत्री मा. श्री. राज्यवर्धनसिंग राठोड यांच्या संकल्पनेतुन गेल्यावर्षी “खेलोइंडिया” हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प केंद्रशासनाने सुरु केला.
“ खेलोइंडियायुथगेम्स ”
देशातील जास्तीत खेळाडुंना आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करण्याची संधी मिळावी तसेच आगामी ऑलिम्पिंक व आशियाई स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने गुणवंत व उदयोन्मुख खेळाडू निवडून त्यांना तंत्रशुध्द प्रशिक्षण व अर्थसहाय्य देणे, खेळासाठी पुरक वातावरण निर्माण करुन सांघिक भावना निर्माण करणे या हेतुने खेलो इंडियाचे आयोजन केले आहे. खेळ हे सर्वांगिण विकासासाठी महत्वपूर्ण असून नेतृत्व गुणांचा विकास होऊन आगामी काळात देश खेळामध्ये महाशक्ती निर्माण व्हावी हा प्रमुख उद्देश ठेवुन सन 2017 -18 मध्येकेंद्रशासनाद्वारे प्रथमचदिल्लीयेथे “ खेलो इंडिया युथ गेम्स” चेआयोजनकेलेहोते.
“खेलो इंडिया युथगेम्स– 2018” मध्ये महाराष्ट्राची कामगिरी :-
महाराष्ट्राने गतवर्षी दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेच्या पदकतालिकेमध्ये 36 सुवर्णपदकांसह व्दितिय स्थान पटकाविलेले होते.
अ.क्र. | राज्याचे नांव | सुवर्ण | रौप्य | कास्य | एकूण |
1 | हरियाणा | 38 | 26 | 38 | 102 |
2 | महाराष्ट्र | 36 | 32 | 43 | 111 |
3 | दिल्ली | 25 | 29 | 40 | 94 |
“ खेलोइंडियायुथगेम्स– 2019”
या वर्षीकेंद्र व राज्यशासनाच्या सयुक्त विद्यमाने द्वितीय खेलो इंडिया युथ गेम्स, 2019 शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे -बालेवाडी, पुणे येथे दि. 08 ते 20 जानेवारी, 2019 या कालावधीत आयोजित करण्याचे निश्चित झालेले आहे. “खेलो इंडिया युथगेम्स” मध्येविविधप्रकारच्या18 खेळांच्या स्पर्धा , 17 वर्षाखालील व 21 वर्षाखालील मुले व मुली या गटात होणार आहे.यास्पर्धेतसंपुर्णदेशामधुनभारतीय शालेय खेळ महासंघाद्वारा आयोजित राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडू/संघ तसेच राष्ट्रीय क्रीडा संघटनेद्वारा आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील संघ/खेळाडू, सी.बी.एस.सी. राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडू तसेच स्पर्धा आयोजक राज्याने निवड केलेलेखेळाडुअसेसुमारे 12,500 खेळाडू, तांत्रिक अधिकारी व स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.
यास्पर्धेमध्येखालीलप्रमाणेखेळप्रकारसमाविष्टअसुन, सदरखेळांच्यास्पर्धानमुदस्थळआणिवेळापत्रकानुसारआयोजितकेल्याजाणारआहेत.
अ.क्र. | खेळबाब | ठिकाण | स्पर्धा दिनांक |
1 | जिम्नॅस्टिक्स | जिम्नॅस्टिक्स हॉल, बालेवाडी, पुणे. | 08-13 जानेवारी,2019 |
2 | वेटलिफ्टिंग | वेटलिफ्टिंग हॉल, बालेवाडी, पुणे. | 09-15जानेवारी,2019 |
3 | ज्युदो | टेबल टेनिस हॉल , बालेवाडी, पुणे. | 09-13 जानेवारी, 2019 |
4 | कुस्ती | कुस्ती हॉल , बालेवाडी, पुणे. | 09-12 जानेवारी,2019 |
5 | बॅडमिंटन | बॅडमिंटनहॉल , बालेवाडी, पुणे. | 10-13 जानेवारी, 2019 |
6 | ॲथलेटिक्स | ॲथलेटिक्स स्टेडियम , बालेवाडी, पुणे. | 10-13 जानेवारी, 2019 |
7 | शुटींग | शुटींग रेंज, बालेवाडी, पुणे. | 10-16 जानेवारी, 2019 |
8 | फुटबॉल | फुटबॉलग्राऊाड,मामुर्डी सिबॉसेस,फ्लेम विद्यापीठ, पुणे. | 10-19 जानेवारी, 2019 |
9 | हॉकी | मुंबई हॉकी असो. ग्राऊंड, मुंबई | 7-15जानेवारी, 2019 |
एनडीअेग्राऊंड, पुणे | 12-20 जानेवारी, 2019 | ||
10 | खो-खो | खो खो ग्राउॅड, बालेवाडी, पुणे. | 13-17 जानेवारी,2019 |
11 | जलतरण | जलतरण तलाव, बालेवाडी, पुणे. | 10-15जानेवारी, 2019 |
12 | बॉक्सींग | बॉक्सींग हॉल , बालेवाडी, पुणे. | 13-19 जानेवारी 2019 |
13 | कबड्डी | बॅडमिंटन हॉल , बालेवाडी, पुणे. | 14-18 जानेवारी 2019 |
14 | लॉन टेनिस | टेनिस कोर्ट , बालेवाडी, पुणे. | 14-19 जानेवारी 2 019 |
15 | व्हॉलीबॉल | बॅडमिंटन हॉल, बालेवाडी, पुणे. | 14-20 जानेवारी 2019 |
16 | बास्केटबॉल | टेबल टेनिस हॉल, बॅडमिंटन हॉल, बालेवाडी,पुणे. | 15-19 जानेवारी 2019 |
17 | टेबल टेनिस | टेबल टेनिस हॉल, बालेवाडी, पुणे. | 16-20 जानेवारी 2019 |
18 | आर्चरी | ए.एस. आय. पुणे | 17-20 जानेवारी 2019 |
“ खेलोइंडियायुथगेम्स– 2019”मध्येमहाराष्ट्र
दि.08 ते 20 जानेवारी, 2019 या कालावधीत संपन्न होणाऱ्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्यावतीने18 क्रीडा प्रकारात 17 वर्षे मुले मुली व 21 वर्षे मुले मुली असे 769 खेळाडू ,72 क्रीडा मार्गदर्शक तसेच व्यवस्थापकयास्पर्धेमध्ये राज्याची कामगिरी उंचावण्यासाठी स्पर्धेपुर्वी 15 दिवसाचे स्पर्धा पुर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
यास्पर्धेमध्येआंतरराष्ट्रीय , राष्ट्रीयपातळीवरकामगिरीकेलेलेखेळाडुसहभागीहोणारआहेत. ज्यांच्याकामगिरीकडेसंपुर्णमहाराष्ट्राच्याक्रीडाक्षेत्राचेविशेषलक्षलागलेलेआहे.
“ खेलोइंडियायुथगेम्स– 2019” आयोजन पूर्व तयारीचा आढावा –
“ खेलो इंडिया युथगेम्स, पुणे 2019” याक्रीडा स्पर्धा आयोजनाची जबाबदारी राज्याकडे सोपविण्यातआलेलीअसल्याने , मागील 2 महिन्यापासून स्पर्धा विषयक तयारी करण्यात येत आहे. राज्य शासनाने यासाठी मा. मंत्री शालेय शिक्षण व युवक कल्याण यांचे अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. तसेच विभागीयमहसुल आयुक्त , पुणेविभाग, पुणेयांचे अध्यक्षतेखाली स्पर्धा सनियंत्रण समिती व उपसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा यांचे अध्यक्षतेखाली स्पर्धा आयोजन सामिती गठित केलेली आहे.
सदर समित्यांद्वारे स्पर्धा आयोजनांची विविध कामे करण्यात येत आहे.पुणेजिल्हा प्रशासन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका , पोलीस विभाग, आरोग्य, पीएमपीएल, पुणे प्रादेशिक परिवहन विभाग व इतर विभागांच्या सहकार्याने स्पर्धेची तयारी करण्यात येत आहे.
स्पर्धेच्या अनुशंगाने आवश्यक बाबी जसे निवास व भोजन व्यवस्था, वैद्यकीय सुविधा सुरक्षा व्यवस्था स्वयंसेवक व्यवस्था क्रीडांगणाची व्यवस्था, इ. बाबी करण्यासाठी क्रीडा विभागामार्फत विविध समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत.
स्पर्धा कालावधितील अन्य आकर्षणे –
Ø सर्व क्रीडांगणांच्या प्रवेश द्वारांना महाराष्ट्रातील नामवंत क्रीडा पटुंची नावे व त्यांची प्रदर्शनी.
Ø क्रीडा संकुलात “स्पोर्टस एक्स्पो” व खेळांचा प्रत्यक्ष आनंद घेण्यासाठी विशेष क्षेत्र राखीव असणार आहे
Ø फिटनेस व संतुलित आहार या अत्यंत मौल्यवान विषयांचे मोफत समुपदेशन
Ø क्रीडामधील कौशल्य विकास व करियरच्या संधी याबाबत मोफत मार्गदर्शन आयोजित केले जाणार आहे.
Ø महाराष्ट्रातील विविध शाळातील खेळाडूंना विशेष निमंत्रीत केले जाणार आहे.
शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे- बालेवाडी, पुणे-45
पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषेदत शालेय शिक्षण व क्रीडा राज्यमंत्री विनोद तावडे यांनी माहिती दिली. यावेळी जीटीसीसीचे चेअरमन राजेंद्र सिंग, खेलो इंडियाचे सीईओ संदीप प्रधान, क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल यावेळी उपस्थित होते.
फोटो ओळ – (डावीकडून ) जीटीसीसीचे चेअरमन राजेंद्र सिंग, खेलो इंडियाचे सीईओ संदीप प्रधान, क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल