काळ कितीही आधुनिक झाला, तरी स्त्रियांवरील अत्याचार हा सामाजिक प्रश्न आजही कायम आहे. स्त्रियांवरील अत्याचाराचा प्रश्नाबरोबरच एका प्रेमकहाणीवर आधारित ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियात लाँच करण्यात आला आहे. १७ जूनला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात रिंकू राजगुरूनं अॅसिड व्हिक्टिमची भूमिका करत पहिल्यांदाच प्रोस्थेटिक मेकअप केला आहे.
अ टॉप अँगल प्रॉडक्शनच्या समीर कर्णिक यांनी “आठवा रंग प्रेमाचा” या चित्रपटाची निर्मिती केली असून आदिनाथ पिक्चर्सच्या आशिष भालेराव , राकेश राऊत प्रॉडक्शन्स यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची कथा, दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांचे असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.चित्रपटाची पटकथा, संवाद समीर कर्णिक यांचे असून समीर कर्णिक यांनी क्युं हो गया ना.. या आपल्या पहिल्याच चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून छाप पाडली होती. त्यानंतर यमला पगला दिवाना, चार दिन की चांदनी, हिरोज अशा उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन समीर कर्णिक यांनी यांनी केलं आहे. चित्रपटाचे अतिरिक्त संवाद हृषीकेश कोळीचे आहेत.चित्रपटाचे छायाचित्रण दुलीप रेमि यांचे आहे. रोहित गवंडी, वलय मुळगुंड, जय अत्रे, आतिक अलाहाबादी यांनी लिहिलेल्या गाण्यांना संगीत प्रिनी सिद्धांत माधव आणि मार्क डी म्यूज यांचे आहे तर चित्रपटातील सुमधुर गाणी कुणाल गांजावाला, सोनू निगम, आदर्श शिंदे, शाहिद मल्ल्या, साक्षी होळकर यांनी गायली आहेत.
ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे, रिंकू राजगुरू आणि विशाल आनंद हा नवा अभिनेता या चित्रपटातून पदार्पण करत आहे. खुशबू सिन्हा यांनी दिग्दर्शकीय पदार्पणातच वेगळ्या धाटणीचा चित्रपट केला आहे. ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे, रिंकू राजगुरू यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत, तर विशाल आनंद हा नवा अभिनेता या चित्रपटातून पदार्पण करत आहे.
चित्रपटाचा टीजर काही दिवसांपूर्वी लाँच करण्यात आला होता. रिंकू राजगुरूचा ग्लॅमरस लूक, विशाल आनंदचा आश्वासक अभिनय या मुळे टीजरनं दमदार प्रतिसाद मिळवला होता. त्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. प्रेमकथेसह स्त्रियांच्या अत्याचार, अॅसिड हल्ला असे गंभीर मुद्दे या चित्रपटातून हाताळण्यात आल्याचं दिसतं. रिंकू राजगुरूनं या चित्रपटात अॅसिड व्हिक्टिमची भूमिका केली आहे. त्यामुळे रिंकूनं या भूमिकेसाठी पहिल्यांदाच प्रोस्थेटिक मेकअप केला आहे. रिंकूनं आजवर केलेल्या भूमिकांमध्ये ही भूमिका खूपच वेगळी असल्यानं खास उत्सुकता आहे. तसंच लक्षवेधी टीजर आणि ट्रेलरमुळे आता प्रेमाचा आठवा रंग या चित्रपटाविषयी असलेली उत्सुकता आणखी वाढली आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना १७ जूनची प्रतीक्षा आहे.