पुणे,दि.०९:- पुण्यातील कोंढवा परिसरात अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका नायजेरियन नागरिकाला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथक १ यांनी
दि ०८/१२/२०२२ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक ०१ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर व स्टाफ असे कोंढवा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना स्टाफ मधील अंमलदार यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील नायजेरियन इसम याला सापळा रचून अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून दोन कोटी 16 लाख 20 हजार रुपये किमतीचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. आरोपी हा पुणे पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, तो नुकताच येरवडा कारागृहातून जामिनावर बाहेर आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.८) रोजी उंड्री येथील मंतरवाडीकडे जाणाऱ्या रोडवर कारवाई करण्यात आली.फॉलरिन अब्दुलअझीज कन्डोई (वय 50, सध्या रा. शकुंतला कानडे पार्क, उंर्ड्री मूळ रा. नायजेरिया) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस हवालदार प्रवीण उत्तेकर यांनी फिर्याद दिली आहे.
अमली पदार्थविरोधी पथक एकचे पोलीस अधिकारी कर्मचारी कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीसांना गोपनीय यांना माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील नायजेरियन व्यक्ती उंड्री मंतरवाडी परिसरात कोकेन या अमली पदार्थाची विक्री करीत आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत असताना मंतरवाडीकडे जाणाऱ्या रोडवरील आर पॉइंट सोसायटीसमोरील रोडवर आय टेन कार घेऊन आरोपी संशयितरित्या उभा असल्याचा आढळून आला.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे कोकेन हा अमली पदार्थ मिळाला.
पोलिसांनी दोन कोटी 16 लाख 20 हजार रुपये किमतीचे 1 किलो 81 ग्रॅम कोकेन, मोबाइल, आय टेन कार,
दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटे, 70 हजार रुपये रोख असा एकूण 2 कोटी 20 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यापूर्वी आरोपीवर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्टनुसार गुन्हा दाखल असून, काही दिवसांपूर्वी तो येरवडा कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता तसेच कस्टम विभागाने सुध्दा त्याचेवर यापुर्वी कारवाई केली होती.सदर
कारवाई ही अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, गजानन टोम्पे, सहा पो आयुक्त गुन्हे १ यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे , शहर कडील विनायक गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार प्रविण उत्तेकर, पांडुरंग पवार, मनोजकुमार साळुंके, विशाल दळवी, संदिप शिर्के, सुजित वाडेकर, राहुल जोशी, विशाल शिंदे, सचिन माळवे, संदेश काकडे, रेहाना शेख, योगेश मोहिते यांनी केली आहे.